गरोदरपणानंतर रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवाल !

गरोदरपणानंतर आपले शरीर व्हायरस विरुद्ध लढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला लगेच सर्दी व खोकलाची लागण होऊन जाते. आणि वातावरण बदल्यावरही खूप त्रास व्हायला लागतो.

ह्याविरुद्ध लढण्यासाठी काही घरगुती उपाय असतात पण तुम्ही त्या करण्याबरोबरच जर साधे व सोपे उपायही करू शकतात.

आणि हे उपाय खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि तुम्ही केव्हाही करू शकता.

 

१) जोरजोराने हसणे किंवा मनमोकळे हसणे

संशोधनानुसार हसण्यामुळे खतरनाक शरीरातले धोकादायक व्हायरस निघून जातात. त्यामुळे शरीर विषाणूंशी लढायला सक्षम बनायला मदत होते. त्यामुळे हसण्याच्या वेळी कोण आपल्याला बघतोय म्हणून हसणे कमी करू नका. तुम्ही कुठेही असा, कुणासमोरही असा पण हसा मनमोकळे.

2) वेळ मिळालाच तर शांत संगीत ऐका

रिसर्चनुसार, मंद संगीत ऐकण्याचा वेळी तुम्हाला शांती मिळते आणि इम्युनोग्लोबुलिन चे प्रमाण सुद्धा वाढवत असते. आणि हे एक महत्वाचे अँटीबॉडी आहे जे व्हायरस लढण्यासाठी खूप मदत करत असते. त्यामुळे वेळ मिळाल्यावर संगीत ऐकाच. पण जर तुम्ही गुणगुणार तर त्याचाही फ़ायदा तुम्हाला इम्यून सिस्टम वाढवण्यास होईल. व उत्साहित सुद्धा वाटेल.

३) थोडा तरी घाम निघू द्या शरीरातून

तुम्हाला जर तुमची रोगप्रतिकार शक्ती सशक्त पाहिजे असेल तर शरीराची हालचाल होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी चालणे, खूप जोराने चालणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. ब्रिटिश डॉक्टर जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन ने सांगितले आहे की, ज्या आई दररोज कमीतकमी ५ दिवस व्यायाम करतात त्यांना ४३ टक्के रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत नाही. व जी सर्दी, खोकला सारखे विकार कधी होणार नाहीच. तुम्ही पहिले असेल गावात व डोंगरात राहणाऱ्या स्त्रियांना कधीच सर्दी, अंगदुखी, खोकला यासारखी विकार होतच नाहीत. तेव्हा थोडीतरी हालचाल सुरु करा.

४) लस घेऊन घ्या

जर तुम्हाला वाटतं असेल की, फक्त बाळालाच लस देत असतील तर ते चुकीचे आहे. प्रसूतीनंतर तुमची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी होऊन जाते. तेव्हा काही लस तुम्हीही टोचून घ्या त्या प्रतिबंधात्मक उपायासाठी उपयोगी ठरतात. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन लसीविषयी विचारून घ्या.

५) पायात मोजे घालून फिरा

पायात मोजे घालणे म्हणजे खूप एलिट असणे असे नाही. तर पायात मोजे घातल्यामुळे तुमची पाय थंड राहून रेस्पिरेटरी व्हायरस पासून तुम्ही वाचतात. कारण जर तुमचे पाय गरम राहिले तर शरीरही गरम होऊन जाते.

६) हाथ धुऊन घेत चला

आपल्या स्वतःच्या स्वच्छतेविषयी काळजी घेतच असतात. पण काही वेळा बॅक्टरीया तुम्हाला पकडून घेतोच. तेव्हा नव्या मातांनी बाळाचे हात चांगली धुऊन घ्यावीत आणि स्वतःचे हातही धुवावीत. डायपर बदल्यानंतर बाळाची शी धुतल्यानंतर. कारण ह्यावेळीच बॅक्टरीया तुमच्यावर आक्रमण करत असतो. तेव्हा हात चांगला धुऊन घेत चला.

७) काही पदार्थ

दही खात चला, त्याचबरोबर लसूणच्या वापर खाण्यात असू द्या, स्ट्राबेरी हंगामात तरी खा, आणि काळी चहाने सुद्धा इम्युनिटी वाढते.

८) बोलत रहा व विचार शुद्ध असू द्या

असेही भारतीय आई जितकी बोलते तितकी जगात कोणतीच आई बोलत नाही. आणि ते चांगलेच आहे. आणि जी आई बोलत नसेल तिने बोलायला सुरुवात करावी. कुणाचेही चांगलेच व्हायला हवे. ह्यामुळे तुमचे स्वतःचेच चांगले होत असते. आणि झोप कमी घेऊ नका जेवढी शरीराला आवश्यक आहे तितकी घेत चला. कारण झोप हे औषध आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: