लहान बाळांसाठी कोणते अन्न निवडाल ? घरगुती की बाहेरचे

हा विषय नेहमी वाद-विवादाचा विषय ठरला आहे. घरची पेज किंवा घरचं खाणं किंवा बाहेरचं विकत मिळणारं बेबी फूड यापैकी कोणतं पौष्टिक आणि सुरक्षित असते. बाहेरचे विकतचे बेबी फूड हे खरंच काळजीपूर्वक आणि योग्य घटकांचा वापर करून तयार केले असते का? त्यात योग्य ती जीवनसत्वे असतात का अश्या हजार शंका आपल्या मनात येतात. हे ठरवणं खरंच कठीण आहे पण आपल्या लहानग्यांसाठी योग्य निर्णय घराणे गरजेचे असते तर आपण या दोन्ही प्रकारच्या बाळाच्या आहार बाबत काही माहिती जाणून घेऊया जी तुम्हांला बाळाचा आहार ठरवायला मदत करेल

बाहेरचं /विकतचे बेबी फूड

ज्यावेळी विकण्याच्या उद्देशाने व्यावसायिक पद्धतीने अन्नपदार्थ तयार करण्यात येतात त्यावेळी बहुतांशी कंपन्या त्या अन्नाचे परीक्षण करूनच बाजारात आणतात. त्यांना सरकारी नियमाप्रमाणे काही तपासण्यांमधून जावे लागते आणि मगच ते बाजारात आणण्याची परवानगी मिळते. एफडीए च्या अंतर्गत तपासणी झालेल्या अन्नपदार्थ सुरक्षित मानण्यात येतात. परंतु हे अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी काही अन्न संरक्षक (preservatives) वापरण्यात येतात. त्यामुळे हे अन्नपदार्थ खराब न होता टिकून राहतात. परंतु विकतच्या अन्नपदार्थतील घटक नीट तपासून पाहणे गरजेचे असते. ते शरीरास हानिकारक नाही ना याची खात्री करून घ्यावी. हा पर्याय तुम्ही ज्यावेळी प्रवास करत असाल किंवा काही कारणामुळे तुम्हांला ताजे अन्न किंवा बाळाचे पेज किंवा पदार्थ तयार करणे शक्य नसेल त्यावेळी याचा वापर करावा. बहुतांश विकतचे बेबी फूड मध्ये क जीवनसत्व संरक्षक म्हणून वापरण्यात येते ते बेबी फूड सुरक्षित असते. पण ते विकत घेण्याआधी त्या उत्पादनाला एफडीए ची मान्यताआहे की नाही तपासून घ्या

फायदे

बऱ्याच काळासाठी साठवून ठेवण्यात येते

प्रवासात वापण्यास सोपे

तोटे

-पदार्थतील घटकांविषयी नेहमी शंका येत राहते

-खूप दिवस टिकून राहण्यासाठी संरक्षकांचा वापर

-महागडा पर्याय

घरी तयार केलेलं अन्न/पेज /आहार 

पालक आपल्या मुलांसाठी दोन मुख्य कारणांमुळे घरच्या अन्नाला प्रधान्य देतात. ते म्हणजे त्याचा मुलांना काय चालते किंवा कोणते घटक चालत नाही याची त्यांना माहिती असते,विकतचे बेबी फूड मध्ये काय आणि कोणते घटक असतात याबाबत पालक साशंक असतात. तसेच घरी केलेल्या पदार्थाची गुणवत्ता ही विकतच्या पदार्थां पेक्षा नक्कीच चांगली असते. तसेच घरच्या पदार्थमध्ये विविध पर्याय उपलब्ध असतात. तसेच तुम्हांला तुमच्या बनवल्या पदार्थमधील घटक माहिती असतात त्यामुळे तुम्ही बाळाला योग्य आणि योग्य प्रमाणातील घटक घालू शकता. अन्न ताजे असते

फायदे :

-ताज्या घटकांपासून बनवलेलं असतात

-बाळाला काय चालते आणि नाही हे माहिती असते . त्याप्रमाणे योग्य आणि प्रमाणात घटकांचा वापर

-गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम

तोटे

-तुमचा जास्त वेळ यात जातो

-काही ताज्या घटकांची किंमत जास्त असते

-तयार व्हायला जास्त वेळ लागतो

आम्हांला अशा आहे तुम्हांला या माहितीचा नक्की फायदा होईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: