आईने आपल्या मुलीला शिकवल्याच पाहिजेत अशा ५ गोष्टी

 

तुमची मुलगी मोठी होऊन एके दिवशी तुमच्यासारखीच समर्थ आणि सुंदर स्त्री बनणार आहे. तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी/पोचण्यासाठी खूप कष्ट केले आणि तुमच्या लहानगीलाही ते करावेच लागतील. म्हणूनच, तुम्ही तुमच्या मुलीला अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत ज्या तिला आयुष्यात पुढे येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला शिकवतील. आणि तिला हे सगळं शिकवण्याची हीच सगळ्यात योग्य वेळ आहे. तिला दुसरं कोणीही ही मुल्ये आणि त्यांचं महत्व शिकवणार नाही- तिला या गोष्टींचे महत्व शिकवा म्हणजे ती ते पुढे कधीही विसरणार नाही.

१) ग्रेस आणि सामर्थ्य

  तुमच्या मुलीला हे शिकवा की प्रत्येक प्रश्नाचं एक सोपं उत्तर नेहमीच असतं, पण ते सोपं उत्तर नेहमी ‘बरोबर’ असेल असं नाही. काहीवेळा, त्यांना अत्यंत अवघड असे निर्णय घ्यावे लागतील/पर्याय निवडावे लागतील आणि परिस्थिती कितीही अवघड होत गेली तरी ताठ मानेने या सगळ्याला सामोरं जाणं त्यांना जमलं पाहिजे. कोणतेही प्रश्न कायमस्वरूपी नसतो. त्या नेहमीच आपल्या समस्या सोडवण्याचा आणि त्यातून अधिक खंबीर बनून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतील.

२) मोठं मन

काही लोक तुमच्या मुलीशी खडूसपणे आणि वाईट वागतील. मात्र, त्याचा बदला म्हणून त्या लोकांशी वाईट वागण्याने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलीला असे शिकवता कामा नये. तिला हे समजावून सांगा की प्रत्येकाच्या स्वत:च्या समस्या असतात आणि कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या असतात. काही वेळा त्यांना या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन हे सर्व विसरावे लागते. तुमच्या मुलीला मोठं मन ठेवायला शिकवा. आणि खरंतर, जर ती तिच्याशी वाईट वागणाऱ्या कुणाशी वाईट वागली, तर त्या दोघांत फरक तो काय!

३) स्वत:बद्दल कम्फर्टेबल असणे

कोणत्याही मुलीला स्वत:ची, त्यांच्या पार्श्वभूमीची त्यांच्या दिसण्याची लाज कधीच वाटू नये. तुमच्या मुलीने स्वत:ला जशी ती आहे तशी स्वीकारायला आणि स्वत:वर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जर ती स्वत:बद्दल कम्फर्टेबल असेल तरच ती आत्मविश्वास बाळगायला शिकेल. तिला शिकवण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे स्वत:चे उदाहरण देऊन शिकवणे, तिला शिकवा कि तुम्ही तुमचं वाढतं वय आणि त्यानुरूप होणारे बदल कसे स्वीकारलेत.

४)  अन्नरूपी इंधन

तिला लहानपणापासूनच शिकवा की, अन्न हेच तिच्या उर्जेचा स्रोत आहे. जेवणाच्या/खाण्याच्या वेळा चुकवण्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि त्याची परिणती मूड स्वींग्स आणि एनर्जी कमी होण्यामध्ये होते. प्रत्येक जेवण/मिल महत्वाचे असते आणि त्यांनी योग्य पोषाणमुल्ये असलेलं खाणं रोज खाणे आवश्यक आहे. भुकेलं राहणं तिच्या सौंदर्यात भर घालणार नाही. जेवण, पाणी आणि झोप याच गोष्टी तिची त्वचा आणि तिला सुंदर बनवणार आहेत. तिला सांगा की स्वच्छ आणि तंदुरुस्त त्वचा हाच एखाद्या मुलीचा सगळ्यात मोठा ‘असेट’ असतो आणि जर ती स्वत:ची काळजी घेत असेल तर हे सहजसाध्य आहे.

५) स्वयंपूर्ण कसे व्हाल

तुमच्या मुलीला स्वयंपूर्ण होण्याचे महत्व समजले पाहिजे. तिला मोठेपणी दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहावं लागता कामा नये. याचसाठी, तिला स्वत:चेच ‘बेस्ट वर्जन’ होण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. तिच्या शिक्षणामुळे तिला जागोजागी फिरावं लागेल आणि तिला ते सिरीअसली घ्यावं लागेल. तिला स्वत:ला, स्वत:च्या स्वप्नांना आणि स्वत:च्या करिअरला प्राधान्य द्यायला सांगा. तिने स्वत:च्या अपेक्षांपेक्षा कमी अशा कोणत्याही गोष्टीवर समाधान मानू नये. तसेच, असा कोणीही जो तिच्या स्वप्नांचा आदर राखत नाही तो तिच्यासोबत वेळ घालवण्याच्याही योग्य नाही हे ही तिने समजून घेतलं पाहिजे.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

 

Leave a Reply

%d bloggers like this: