गर्भपात आणि नंतरच्या गर्भधारणेबाबतच्या काही गोष्टी

गर्भपात होणे हा कधीही वेदनादायक आणि दुखद अनुभव असतो. गर्भपाताचे कारण काहीही असले तरीही यातून जाणाऱ्या स्त्रियांसाठी हा काळ अवघड असतो. अनेक जोडपी त्यांच्या आर्थिक किंवा इतर परिस्थितींमुळे गर्भपात करून घेतात तर काहींच्या बाबतीत शारीरिक किंवा वैद्यकीय गुंतागुंतीच्या स्थिती उद्भवल्यामुळे गर्भपात करावा लागतो. असे असले तरीही याबाबतीत गर्भपातानंतर गर्भधारणा हा एक चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि सोबतच याविषयी समाजात अनेक गैरसमज पसरलेले आपल्याला दिसतात.

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला याबाबतीत तथ्यपूर्ण गोष्टी आणि त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण काही गैरसमज अस्तीत तर ते दूर होण्यास मदत होईल.

१) गर्भपातामुळे प्रजनन क्षमता कमी होत नाही

समाजमनामध्ये अनेकदा असं गैरसमज आढळून येतो की कोणाचे अबोर्शन झाले तर ती स्त्री परत गरोदर राहू शकत नाही. जर तज्ञ डॉक्टरांद्वारे योग्य रीतीने गर्भपात झाला असेल तर तुमच्या प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही पुन्हा गरोदर राहू शकता. प्रजनन क्षमता कमी होण्याचा प्रश्न तेंव्हाच उद्भवतो जेंव्हा गर्भपात प्रक्रीये दरम्यान प्रजनन प्रणालीतील एखादया अवयवास इजा होते. आजकालच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशी इजा होण्याचे प्रकार लाक्षणिक रित्या कमी झाले आहेत.

२) वारंवार गर्भपात केल्यास तुम्ही अप्रजननशील होऊ शकता

गरोदरपणा पुढे ढकलण्यासाठी गर्भपात करणे ठीक असते, परंतु वारंवार गर्भात झाल्यास गर्भापिशवीच्या वरच्या बाजूस किंवा गर्भाशयावर व्रण येतात. ज्यातून गर्भप्रणाली कमकुवत होऊन जाते. यामुळे गर्भाशय अप्रजननशील होते. यातून गरोदरपणाच्या संधी कायमस्वरूपी संपून जातात.

३) गर्भपातानंतर गर्भनिरोधक आवश्यक आहेत

गर्भातानंतर देखील तुमच्या शरीरात अंडचयानाची प्रक्रिया चालू असते. त्यामुळे तुम्ही गर्भानिरोधाकांचा वापर न केल्यास तुम्ही परत गरोदर राहू शकता. नको असलेला गरोदरपणा तेही गर्भपातानंतर तुमच्या आरोग्यासाठी घटक असते. तुम्ही मानसिकरीत्या देखील या परिस्थितीला तयार नसता.

४) तज्ञांचा सल्ला घ्या

तुम्ही गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणेचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य राहील. यासाठी गरजेच्या असलेल्या सगळ्या टेस्ट आणि चेक अप तुम्ही करून घ्या. तुमच्या शरीराची तपासणी करून ते गर्भधारणेसाठी तयार आहे का ह्याची खात्री करूनच पुढचे पाउल उचला.

५) गर्भपातानंतर नजीकच्या काळात गर्भधारणेचा विचार टाळा

तज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भपातानंतर लगेचच गरोदर राहणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गर्भपात आणि त्यानंतरची गर्भधारणा यात किमान ३ महिन्यांचे अंतर असायलाच हवे. गर्भाशयाला पुन्हा बरे होण्यास एवढा काळ जावा लागतो. गर्भपातानंतर गर्भाशय माऊ झालेले असते. त्यामुळे गर्भधारणा झाल्यास ते बीजाला बाहेर टाकते यामुळे अतिरक्तस्त्राव होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते योग्य असेच आहे की हा मधला काळ तुम्ही ६ महिन्यांचा ठेवावा ,जेणेकरून तुमच्या गर्भधारणेत गुंतागुंतीच्या स्थिती उद्भवणार नाहीत.

६) लोहाचे प्रमाण आहारात वाढवा

जर तुम्ही गर्भपातानंतर गर्भधारणेच्या विचारात असाल तर आहारात भरपूर प्रमाणात लोहाचा समावेश करा. खास करून तुमचे गर्भारपण उशिराचे असेल किंवा यापूर्वी तुमचे अनेकदा अबोर्शन झाले असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक ऍसिड च्या गोळ्या या काळात घेतल्या जातात. यामुळे गर्भाच्या वाढीत येणारे अडथळे दूर होतात आणि निरोगी प्रेग्नेन्सीचा अनुभव तुम्हाला घेता येतो.

७) संभोगाचे प्रमाण वाढवा

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रायात्ना करत असाल तर तुमच्या मासिक चक्रांच्या मधील सर्वात जास्त प्रजननशील दिवसांमध्ये संभोग करा जेणेकरून तुमच्या गर्भधारणेच्या संधी वाढतील. गर्भपातानंतर शरीर पुन्हा मूळ स्थितीत येण्यास थोडा वेळ घेते त्यामुळे काळजी करू नका आणि तुमच्या आशा सोडू नका. तुमच्या संप्रेरकांच्या रचनेला सामान्य पातळीवर येण्यास वेळ लागू शकतो.

८) सहाय्य गर्भधारणेचा विचार करा

गर्भपात झाल्यानंतर अनेक स्त्रियांना सर्व काही काळजी घेऊन सुद्धा पुन्हा गरोदर होण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी सहाय्य गर्भधारणेचा उपाय तुमच्याकडे उपलबद्ध असतो. सहाय्य गर्भधारणा निर्माण करणारे आयव्हीएफ (IVF) आणि आययुएफ(IUF) नावाचे तंत्र आजकाल विकसित झाले आहे. तुम्ही एखादे चांगले क्लिनिक शोधून तुमची चौकशीची वेळ घेऊ शकता. तुम्ही याबद्दल विचार करण्यासाठी तुमचा वेळ जरूर घ्या.

आयव्हीएफ या तंत्रात गर्भ शरीराच्या बाहेर पेट्री-डिश मध्ये तयार केला जातो आणि नंतर त्याला गर्भात विकसित केले जाते. आणि आययुएफ या तंत्रात फर्टीलायझेशन हे गर्भातच सहाय्यरीत्या बिंबवले जाते. यापैकी आययुएफ हे तंत्र जास्त प्रमाणात निवडले जाते.            

Leave a Reply

%d bloggers like this: