तुमच्या बाळाची नाळ तुमच्या कुटुंबाची जीवनरेषा (स्टेम सेल विषयी माहिती )

 
सर्वात आधी तुम्ही आई होणार आहात याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !  तुम्हाला माहित आहे का , तुमच्या बाळाचा जन्म तुमच्या संपूर्ण परिवाराच्या आरोग्याचे रक्षण करू शकतो ? हो! हे शक्य आहे. खूप व्यक्तींना स्टेम सेल बद्धल जाणून घ्यायचे आहे. नेमके स्टेम सेल काय प्रकरण आहे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून जाणून घ्या स्टेम सेल विषयी.

कसे ?याचे उत्तर स्टेम सेल्स मध्ये लपले आहे. या विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या रचनात्मक कोशिका असतात ज्या तुम्हाला आणि तुमच्या बाळाला जोडणाऱ्या गर्भनाळेत उपस्थित असतात. स्टेम सेल्स मध्ये शरीरातील कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये रुपांतरीत होण्याच्या क्षमता असतात. म्हणजेच या पेशींचे संवर्धन करणे केवळ तुमच्या बाळासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय उपयोगाचे आहे. याने तुमचे ’निरोगी परिवार, सुखी परिवार‘ चे स्वप्न पूर्ण देखील होईल. या पेशींच्या जतनामुळे तुमच्या बाळाला आणि परिवाराला होऊ शकणाऱ्या ८० प्रकारच्या आजारांचे उपचार करता येतील.

भविष्यात या पेशींमुळे उपचार करता येऊ शकणाऱ्या रोगांच्या संख्येला मर्यादा नसतील.

तुम्ही काय करू शकता?जेंव्हा तुमचे बाळ जन्माला येईल तेंव्हा ‘स्टेम सेल बँक’ मध्ये नोंदणी करा. ह्या नोंदणीमुळे तुम्ही तुमच्या गर्भनाळेतील रक्त आणि उती म्हणजेच टीश्यु या दोन्हीचे जतन करू शकता. या नाळेतून जतन केलेल्या या स्टेम सेल्स मध्ये अनेक रोगांवरची उपचारात्मक क्षमता असते. याचा वापर पुनर्भरणासाठी सुद्धा केला जातो.

स्टेम सेल बँकेची निवड कशी कराल ?

भारतीय बाजारात अनेक स्टेम सेल बँक उपलब्ध आहेत. या बँकांची निवड योग्यरित्या करणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे किंवा इतर पालकांकडे विचारपूस करू शकता. बँक निवडतांना त्याची संपूर्ण माहिती आणि प्रमाणीकरण याबद्दल जरूर खात्री करून घ्या.

त्या संस्थेचे आर्थिक स्थिरीकरण याची देखील माहिती तुम्ही घेऊ शकता.

आणखी एक उत्तम पर्याय या स्टेम सेल्स बँकेकडे असतो तो म्हणजे ‘कम्युनिटी बँकिंग’. या क्म्युनित्य बँकिंगची संकल्पना म्हणजे जतन केलेले स्टेम सेल्स नोंदणी केलेल्या पालकांसोबत शेअर केल्या जातात. अशाप्रकारे जे कोणी या स्टेम सेल्स बँकेचे नोंदणीकर आहेत त्यांना सर्वांना एका मोठ्या प्रमाणातल्या स्टेम सेल्स च्या साठ्यात प्रवेश मिळतो. तुमच्या परिवारातील इतर सदस्य देखील यात नोंदणी करून सहभाग घेऊ शकतात.


जेंव्हा स्टेम सेल्सची गरज भासते आणि त्यासाठी तुम्हाला एखादा दाता हवा असतो तेंव्हा या कम्युनिटी पूल म्हणजेच साठ्यातून तुम्हाला तुमच्याशी जुळणारा स्टेमसेल शोधून उपलब्ध करून दिला जातो. ह्या कम्युनिटी पूल मधील स्टेम सेल्स याचा भाग असलेल्या सर्वांसोबत शेअर केल्या जातात त्यामुळे तुम्हाला जुळणारा सेल मिळण्याच्या संधी वाढतात. स्टेम सेल्सद्वारे उपचार होऊ शकणाऱ्या सर्व आजारांसाठी हे सेल्स उपलब्ध असतात. सर्वाधिक आजारांसाठी स्टेम सेल्स ची गरज भासते (८०% पेक्षा जास्त) तेंव्हा जुळणारा सेल हा कम्युनिटी पूल मधूनच मिळू शकतो.


तुमच्या शिशूच्या स्टेम सेल्स चे जतन करण्याची संधी एकदाच आणि त्याच्या जन्मावेळीच साधली जाऊ शकते. तर तुम्ही आता गरोदर आहात तेंव्हा लवकरच एखाद्या योग्य स्टेम सेल्स बँकची माहिती मिळवा झ्यामध्ये कम्युनिटी पूल चा पर्याय उपलब्ध असेल आणि आपली नोंदणी करा.
पण ह्यावर अजूनही संशोधन चालू आहे. त्यामुळे ह्यासंबंधी सर्व गोष्टी जुळून यायला वेळ लागेल आणि ह्याचा खर्चही खूप आहे. फक्त ही गोष्ट तुम्हाला व सर्वानाच माहिती असायला हवी. त्यासाठी हा लेख/ ब्लॉग.

Leave a Reply

%d bloggers like this: