वडिलांनी मागितलेली माफी ! ! ! !

       आज ज्या आई झालेल्या आहेत त्यांना आज त्यांच्या वडिलांची नक्कीच आठवण येते. पण त्या स्वतःच आई झाल्यामुळे त्यांच्या वडिलांविषयीच्या भावना मनाच्या कोपऱ्यात दडून राहतात. त्या सर्व आईंसाठी त्यांच्या वडिलांवर असलेल्या प्रेमासाठी हा ब्लॉग. वडील आणि मुलामधील भावनिक बंध म्हणजे कोणीच शब्दात व्यक्त करु शकत नाही असे काहीतरी. आणि म्हणूनच, वडील आई इतके भावनाप्रधान सहसा दिसत नाहीत. शब्दांपेक्षा कृतीने व्यक्त होणारे जणू! इथे आहेत अशा बाबांची ५ हृदयस्पर्शी असलेले माफीचे मागणे जे वाचताना तुम्हाला तुमच्या वडिलांची अगदी अनावर आठवण येईल.

१) ‘तुझ्या जन्मावेळी मी उत्साहापेक्षा जास्त घाबरलेलाच होतो…’

इथे हा नवा जीव आहे ज्याची काळजी त्याला करावी आणि घ्यावी लागणार आहे. जर त्याने यात काही चुकीचं केलं किंवा त्यातून बाळाला इजा पोहोचली तर? बाळाची आई आता बाळाबरोबरच तर सगळा वेळ घालवणार नाही ना? यापुढे तो नेहमीसाठीच आता ‘सेकंड चॉईस’ बनणार नाही ना?- हे बाळाच्या वडिलांच्या डोक्यात सुरुवातीला चालणाऱ्या काही गोष्टींपैकी थोडंसं. पण ज्या क्षणी तो आपल्या मुलाला/मुलीला आपल्या हातात घेतो, त्याला वाटणारी सगळी काळजी त्याच्या बाळाच्या लहानग्या हातांपुढे, जांभया आणि रडण्यापुढे अगदीच क्षुल्लक वाटू लागते.

२) ‘त्या वेळी तुझ्याबरोबर राहू शकलो नाही याचं मला वाईट वाटतंय’

आपल्या आयुष्यात अशी एकतरी वेळ येते जेव्हा आपल्याला तो क्षण आपल्याला आपल्या वडलांसोबत शेअर करावासा वाटतो. तो तुमचा स्टेजवरचा पहिला डान्स असू शकतो किंवा तुमचा पदवीदान समारंभ ज्याला त्यांच्या कामामुळे त्यांना येता आलं नाही. विशेषत: आई जर ‘होम-मेकर (गृहिणी)’ असेल एक पालक म्हणून तीच सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावते आणि बाबाच्या मात्र अशा अनेक संधी हुकतात. याचा अर्थ वडलांना मुलांच्या आयुष्यात सहभागी व्हायचं नसतं असं नाही. मात्र काही वेळा हे अगदीच अपरिहार्य असतं आणि त्याला या सगळ्याचं प्रचंड वाईटच वाटतं.

३) ‘मी कोणाला निवडेन? तुला का तुझ्या आईला?’

माणसाला कल्पनाशक्तीची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. आपण बऱ्याचदा आपल्या डोक्यातच घटना तयार करतो आणि त्या आपण कशा सोडवू याचा विचार करतो. आई का बाबा असा प्रश्न मुलांना पडणं साहजिक आहे. तसच वडील म्हणून आपण पत्नी आणि मूल यामधील कोणाला निवडू असं प्रश्न पडू शकतो मात्र अशा घटना खऱ्या आयुष्यात खरोखरच दुर्मिळ असतात.

४) ‘तुला माझा अभिमान वाटावा असं मला वाटतं’

“बाबा, मला तुमचा अभिमान वाटतो,” यापेक्षा गोड एखाद्या बाबासाठी कोणतेच शब्द नाहीत. आपण आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांच्याकडून होणारं कौतुक आणि त्यांना आपला अभिमान वाटत असल्याचंच जणू काहीही करून ऐकायचं असतं. बाबालाही आपल्या मुला/मुलीला आपल्याला ‘बाबा’ म्हणून हाक मारताना अभिमान वाटावा हेच वाटत असतं.

५) ‘मला नेहमीच कडक वागायचं नाहीये!’

पॉकेट मनी? का वीकेंड आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर घालवणं? असा कोणताही प्लॅन असला तरी आपण सगळ्यात आधी आपल्या आईलाच विचारतो कारण ‘बाबा खूप कडक आहेत’ हे आपल्या मनात खूप आधीपासूनच ठसलेलं असतं. आणि ‘थांब, मी हे आता तुझ्या बाबांनाच सांगते,’ हे तुमच्या आईचं तुम्हाला सांगणं हे तर याचंच उदाहरण!

मात्र तुमच्या बाबाला नेहमीच असं वाटत असतं की तुम्ही तुमची गुपितं आपल्याबरोबर शेअर करावीत, आपल्याबरोबर मजा करावी. बहुतेक तुमच्या आईसाठी एखादं छोटं कुत्र्याचं पिल्लू घेण्याचा तुमचा ‘सिक्रेट’ प्लॅन असेल!

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: