काखेतील दुर्गंधी तुमच्या आरोग्याविषयी हे सांगते…

आर्मपिट्स म्हणजे तुमच्या काखेची जागा जिथे  सर्वात जास्त घाम येत असतो आणि तसं पाहिलं तर आपण या समस्येविषयी काहीच खास असं करू शकत नाही. तुम्ही तुम्हाला येणारा घाम नियंत्रित करू शकत नाही. बहुतेक लोकांना  त्यांच्या काखेत  येणाऱ्या घामाविषयी आणि खास करून त्या घामाच्या वासामुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. या घामाचा कपड्यांवर डाग देखील पडतो. यासाठी डिओड्रंटचा वापर केला जातो पण तो उपाय तात्पुरता मर्यादित असतो.
काखेतून दुर्गंधी येण्याची समस्या अनेक व्यक्तींना सतावते कारण त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो. या दुर्गंधीमुळे इतर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनावरही परिणाम होतो.

ही दुर्गंधी का येते?


शरीराचे तापमान वाढून हा घाम बाहेर टाकला जातो. घाम येण्याविषयी तुम्हाला काळजी करण्याचे काहीच काम नाही , कारण घाम येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. खरा प्रश्न तेंव्हा निर्माण होतो जेंव्हा या घामाची दुर्गंधी यायला सुरवात होते. या दुर्गंधी येण्यामागचे कारण असे की हा घाम शरीरावरील जीवाणूंच्या संपर्कात येतो आणि त्यांमध्ये रिअॅक्शन होते. मुळात तुमच्या शरीरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या घामाला काहीच दुर्गंधी नसते. शरीरावरील मृत पेशींच्या संपर्कात आल्यावर, जीवाणूंना वाढीची संधी निर्माण होते. या पेशी एकातून दोन अशा वाढत जातात आणि त्यामुळे  काखेतूनमधून दुर्गंध येतो.

या गोष्टी  तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते ?


खाज .
तुमच्या काखेत खाज येत असेल तर हे एखाद्या डिओड्रंटची ऍलर्जी असू शकते किंवा रेझरच्या वापराने   तुम्हाला त्वचेचे छिद्र उघडल्यामुळे तिथे घाम येऊन ही खाज येत असू शकते.

गर्मीत घामामुळे जीवाणूंचा संसर्ग होऊन त्यामुळे तुमच्या शारीरिक स्वच्छतेवर घाव घालणारी बुरशी निर्माण होऊ शकते.
जर काखेत तुम्हाला असामान्य केसांची वाढ आणि पसची निर्मिती झाल्याचे आढळले तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्या.

दुर्गंधची कारणे

जर तुम्ही तुमच्या सर्वात छान वासाच्या अॅन्टिबॅक्टेरीअल  साबणाने अंघोळ करून देखील जर तुमच्या काखेतून दुर्गंध येत असेल तर कदाचित तुम्हाला थायरॉइडची समस्या असू शकते. शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनामुळे देखील अशी दुर्गंधी येते.

या अर्थ असाही असू शकतो की तुमच्या शरीरात उपस्थित असलेले ‘केटोओसिडासिस’ म्हणजेच तुमच्या रक्तात असणारे एक प्रकारचे आम्ल जे साखरेचे पचन घडवून आणते ते योग्यरित्या काम करत नाहीये. म्हणजे तुम्ही खाल्लेली साखर योग्यरित्या ब्रेक डाऊन होत नाहीये. हा एक धोक्याचा इशारा आहे की तुम्हाला मधुमेह असू शकतो. त्यामुळे असे असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतलेली कधीही चांगली.

दुर्गंधी येण्यामागची दुसरी कारणे काय असू शकतात?
जर तुम्ही कोणत्या प्रकारची औषधी घेत असाल तर त्या औषधींचा एक साइड इफेक्ट म्हणून सुद्धा तुमच्या काखेत वास येत असू शकतो.

तिखट खाणे.

अति तिखट पदार्थांचे सेवन देखील तुमच्या काखेत वास येण्यामागचे कारण असू शकते. कडीपत्ता, लसून, अदरक, मिरच्या यासारख्या मसालेदार पदार्थांमध्ये सल्फर असते. या सल्फरला शरीरातून बाहेर पडण्याचा एकाच मार्ग असतो तो म्हणजे शरीराची उघडी छिद्रे. तुमच्या घर्मग्रंथी उघडतात आणि त्यांमधून सल्फर बाहेर पडतो आणि पर्यायाने याचीच दुर्गंधी येते.
या येणाऱ्या दुर्गंधीमुळे तुम्हाला चारचौघात अवघडल्यासारखे वाटणे साहजिक आहे. तिखट खाण्यामुळे तुमच्या ढेकर आणि पार्श्वभागातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक वायूचा देखील दुर्गंध येतो. यासाठी अति तिखट खाणे टाळा.

तणाव

तणाव हे काखेतून दुर्गंध येण्याचे मोठे कारण असू शकते. जेंव्हा तुम्हाला अतिशय तणाव येतो तेंव्हा तुमच्या ‘अपोक्रीन’ नावाच्या ग्रंथीमधून घाम बाहेर येतो . या ग्रंथी या ग्रंथी तुमच्याकाखेतील केसांच्या बीजकोषात उपस्थित असतात. यातून येणारा घाम तुमच्या त्वचेवरील जीवाणूंच्या संपर्कात येतो आणि दुर्गंध निर्माण होतो.
यावरील उपाय म्हणून तुमच्या मनावरील तणाव कमी करा. मन आणि डोके शांत ठेवा. तुमचा तणाव कमी झाल्यास आपोआप हे कमी होऊ शकते. तुम्हाला गरज असल्यास तुमच्या त्वचेच्या डॉक्टरांच्या सल्यानुसार तुम्ही अॅन्टी पर्स्परैशन म्हणजेच या घर्म ग्रंथींमधून येणाऱ्या द्रव्याला रोखणारे औषध घेऊ शकता. पण केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे घ्या.
जर तुमच्या पतीच्या बगलांचा दुर्गंध येत असेल तर त्यांच्याकडे लक्ष दया. अति मद्यसेवन केल्याने मूत्रपिंडावर ताण येतो आणि यामुळे देखील काखेतून दुर्गंध येऊ शकतो.

कॅफेन अति सेवन


तुम्ही घेत असलेल्या कॅफेन म्हणजेच कॉफीचे सेवन नियंत्रित करा. कॉफीने हाच परिणाम शरीरावर होतो आणि काखेत कुबट वास येतो. थोड्या प्रमाणात कॉफी ठीक आहे.
जर तुमच्या काखेमध्ये ध्ये एखादी त्वचेची रॅश आली असेल तर त्या जागी बर्फ चोळा. त्या जागी थोडे तापमान कमी होऊ दया याने ही समस्या कमी होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: