गर्भावस्थेत पाठीच्या समस्यांना दूर ठेवण्याचे ५ हमखास उपाय

गर्भावस्थेत एकीकडे आई होण्याचा आनंद असतो तर दुसरीकडे काही छोट्या -मोठ्या शारीरिक समस्यांना प्रत्येक स्त्रीला सामोरे जावे लागते. पाठदुखी हा असाच एक त्रास आणि याची अनेक कारणे आहेत. जसे कि संप्रेरकांतील  होणारे बदल, गर्भावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि याचबरोबर तणावामुळे हि पाठदुखी होऊ शकते.

* पाठदुखीच्या समस्येमागील कारणाना जाणून घेउया :

१] पाठदुखी होण्यामागील एक सामान्य कारण म्हणजे रीलॅक्सिन या संप्रेकाचा अचानक होणार स्त्राव,ज्यामुळे पाठीच्या आतील भागाच्या आजूबाजूला असणारे स्नायू सैलावतात आणि पाठीची स्थिर असलेली रचना बिघडते.

२] गर्भावस्थेमुळेही, पाठीच्या भागातील रेक्टस अब्दोबिमीनीस या स्नायूंची ज्यांना आपण ऍब्स म्हणून ओळखतो,रचना विस्कळीत होते. गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे पाठीवर ताण येतो आणि पाठ दुखायला लागते.

३] गर्भावस्थेदरम्यान अपुऱ्या प्रमाणात झोप हे पाठदुखी मागचे एक महत्वाचे कारण असू शकते. आरामदायक अवस्थेत न झोपण्याने तुम्हाला गंभीर पाठदुखीचा सामना करावा लागू शकतो.

पाठदुखीमुळे तुम्हाला  होणारी बेचैनी आणि प्रचंड वेदना आम्ही समजू शकतो म्हणूनच आपण या त्रासाला दूर ठेवण्याचे ५ उपाय पाहूया.

१} उंच टाचेची पादत्राणे घालणे टाळा

या अवस्थेत शरीराचे योग्य संतुलन राखले जाणे खूपच महत्वाचे असते. पाठदुखीचा त्रास टाळण्यासाठी उंच टाचांची पादत्राणे न वापरता सपाट चप्पल किंवा स्निकर वापरा.

२} प्रसुतीपूर्व योग

अनेक  फायद्यांमुळे योग करणे गरजेचे ठरते. हा प्राचीन प्रकार म्हणजे सर्व शरीराच्या सर्व दुखण्यांवर परिणामकारक उपाय आहे आणि पाठदुखी ही  याला अपवाद नाही. शरीराचे योग्य संतुलन राखण्यासाठी आणि संप्रेरकांचे असंतुलन रोखण्यासाठी योग फायदेशीर ठरतो. पण हेडॉक्टरांच्या सल्ल्याने करा

३} दोन्ही पायांवर (उकिडवे) बसणे

या अवस्थेत खाली वाकण्याचे जास्तीत जास्त टाळा. जड वस्तू उचलणे पूर्णपणे टाळा आणि अशी वेळ आलीच तर खाली वाकून भार उचल्यापेक्षा दोन्ही पायांवर बसलेल्या अवस्थेत वजन उचला .असे करण्याने तुमच्या पाठीवर अतिरिक्त ताण येणार नाही आणि पाठदुखी टाळता  येईल.

४} झोपण्याच्या अवस्थेत बदल करा

पूर्ण रात्र पाठीवर झोपण्याने तुमच्या पाठीत वेदना होऊ शकतात त्यासोबतच,वाढते वजन तुमच्या पाठीवर ताण आणत असते. हे टाळण्यासाठी एका अंगावर झोपण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा. पाठीला आराम पोहचवण्याचा हा पिढया न पिढ्या केला जाणारा सोपा उपाय आहे. अगदी आज रात्रीपासूनच तुमच्या झोपण्याच्या अवस्थेत बदल करा आणि फरक अनुभवा .

५} बर्फाचा शेक घ्या

तुमच्या पाठीत प्रचंड वेदना होत असतील तर एका टॉवेल मध्ये बर्फाचे काही तुकडे गुंडाळा आणि हे पाठीवर चोळण्यास तुमच्या पतीला सांगा. याने तुम्हाला  लवकरच आराम मिळेल. परंतु हे जास्त वेळ करू नका.अन्यथा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात 

 

Leave a Reply

%d bloggers like this: