जाणून घेऊया डबल /ट्रिपल मार्कर तपासणी म्हणजे काय

 

      जन्माला येणारे बाळ निरोगी आणि सुदृढ असावे असे प्रत्येक आईला वाटते,हो ना? तुम्ही गरोदर असतांना बाळ आणि तुमच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी अनेक तपासण्या केल्या जातात.  अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळ अगदी भ्रूणावस्थेत असतांनाच संभाव्य दोषांची तपासणी करणे आता शक्य आहे.

अशा तपासण्यांपैकी,मार्कर तपासणी बाळातील जन्मतः दोष आणि गुणसूत्रीय आजारांचे निदान करण्यासाठी केली जाते. तुमच्या बाळातील संभाव्य दोष ,विशेषतःडाऊन्स सिंड्रोम आणि इतर गुणसूत्रीय आजारांची  पडताळणी याद्वारे केली जाते. या आजारांमुळे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होतो यामुळेच गर्भावस्थेच्या पहिल्या आणि दुसऱ्या त्रेमासिकांमध्ये या चाचण्या आवर्जून केल्या जातात.

१] डबल मार्कर तपासणी

गर्भावस्थेच्या १०-१३ आठवड्यांदरम्यान डबल मार्कर तपासणी केली जाते. भ्रुणातील डाउन्स सिंड्रोम,ट्रायसोमी १८ आणि ट्रायसोमी २१ या आजारांची शक्यता पडताळण्यासाठी ही चाचणी करतात.

रक्ताच्या तपासणीदवारे PAPP-A  आणि HCG मार्कर आणि गुणसूत्रीय दोषांची निश्चिती करण्यासाठी अल्ट्रासाऊंड नुचल केले जाते. इतर जास्तीच्या तपासण्या करण्याची आवश्यकता आहे की नाही हे डॉक्टरांना समजण्यासाठी या चाचण्या  महत्वाच्या असतात. बाळाच्या  मानेचा मागच्या बाजूचा अर्धपारदर्शक भाग ,जो द्रव पदार्थ आणि इतर दाट घटकांनी बनतो यास [Nuchal Translucency] NT असे म्हटले जाते. हा भाग १४ आठवड्यानंतर नाहीसा होतो म्हणून हि तपासणी १४ आठवडांच्या आत करणे गरजेचे असते.

२] ट्रिपल मार्कर तपासणी

गर्भावस्थेच्या साधारणतः १४-२० आठवड्यांदरम्यान ट्रिपल मार्कर तपासणी केली जाते.बाळाला असू शकणाऱ्या डाउन्स सिंड्रोम,एड्वर्डस सिंड्रोम आणि मज्जासंस्थेशी संबंधित इतर दोषांची पडताळणी या चाचणीद्वारे केली जाते.

बाळाच्या नाळेमध्ये असणाऱ्या अल्फा-फेटोप्रोटीन[ AFP] ,ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन [HCG]आणि आस्ट्रियॉल चे प्रमाण यात तपासले जाते. या सोबतच इन्हीब्लिन A  चे प्रमाण तपासण्यासाठी क्वाड्रापल मार्कर तपासणी करण्याचा हि पर्याय उपलब्ध आहे.

या तपासण्या करवून घेण्याची आवश्यकता कुणाला असते आणि यातील काही धोके

तुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल तर होणाऱ्या बाळाला डाउन्स सिंड्रोम असण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. २० पैकीं १ स्त्रीला डाउन्स सिंरोम असणारे बाळ होण्याची शक्यता असते. अशी शक्यता खूपच जास्त आढळला तर खात्री करण्यासाठी अमीनोसिन्टेसिस नावाची चाचणी केली जाते.

बहुदा ,३५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांना या चाचणीची शिफारस केली जाते पण गरज असल्यास या पेक्षा कमी वय असणाऱ्या मातांना सुद्धा हि चाचणी करावी लागते.

या मार्कर तपासण्या करण्याचा खर्च २५,००० किंवा यापेक्षा जास्त हि येऊ शकतो.

Leave a Reply

%d bloggers like this: