ओठावरची लव ह्या घरगुती उपायांनी काढा. . .

तुमचा अप्पर लीप हेयरमुळे (ओठाच्या वरच्या बाजूला केस असणे) आत्मविश्वास कमी होतोय का ? तेव्हा हे घरगुती उपाय करून बघा. आणि हे नैसर्गिक चेहऱ्यावर केस सामान्यत असतात. मग ते स्त्रियांमध्येही असतात. पण ओठावर केस काही स्त्रियांना खूप कमीपणाचे व न्यूनगंडाचे वाटते. असेही बाजारात खूप उत्पादने आहेत. पण इतका खर्च करून साईड इफेक्टही होऊ शकतो. आणि किती फरक पडेल याविषयी सुद्धा शंकाच असते. तेव्हा हे नैसर्गिक उपाय करून बघा.

१) हळद व दूध

      दूध तुमच्या त्वचेला आद्रतायुक्त मुलायम बनवतो. आणि हळद त्वचेला चमक देत असते. त्यासाठी एक चमचा दूध आणि हळद घेऊन एका वाटीत घ्या. आणि खूप हळुवारपणे हे मिश्रण तुमच्या वरच्या ओठावर लावा. आणि हे मिश्रण लावल्यानंतर त्याला कोरडे होऊ द्या. आणि त्यानंतर बोटांनी ते मिश्रण काढून घ्यावे. तिथल्या केसांना विरुद्ध दिशाला रगडून काढायचे. खूप दुखणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. आणि नंतर थंड पाण्याने त्याला धुवून काढावे.

२) अंड्याचा पांढरा भाग

अंड्याचा पांढरा भाग घ्या. आणि त्याला थोडे मक्याचे पीठ घेऊन त्यात साखर मिसळून घ्यावी. मिश्रण ला तितका वेळ मिसळा तोपर्यँत तिची पेस्ट होत नाही. आणि जेव्हा ते मिश्रण पेस्ट होईल तेव्हा त्याला ओठावर लावा. तीस मिनिटपर्यंत कोरडे होऊ द्या. आणि त्यानंतर त्याला काढा. खूप चांगलं परिणाम होण्यासाठी आठवड्यात २ वेळा हा प्रयोग करावा. आणि हळूहळू केस त्या जागेवर यायला कमी होऊन जातील.

३) हरभऱ्याची डाळ

हरभऱ्याची डाळ केस हटवण्यात चांगलीच मदत करत असते. त्यासाठी हरभऱ्याचे पीठ घ्या. त्याला थोडी हळद व पाणी सोबत मिसळून घ्यावे. घट्ट पेस्ट बनवल्यानंतर त्यात ताजे क्रीम मिसळून द्या. आणि ते मिश्रण वरच्या ओठावर लावा. आणि कोरडे झाल्यावर त्याला विरुद्ध दिशेला रगडून त्या केसांना काढून घ्या.

४) साखर

वेदनारहित वॅक्सिंग करण्यासाठी साखर खूप उपयुक्त आहे. ये केसाला हटवण्यासोबत त्याला येण्यापासून थांबून ठेवतो. त्यासाठी तव्यात साखर घेऊन घ्या आणि त्याला गरम करा. गरम साखर मध्ये निंबूचा रस मिसळा, आणि त्याला घट्ट होऊ द्या. घट्ट झाल्यावर ते मिश्रण थंड होऊ द्या. आणि थंड झाल्यावर त्या मिश्रणाला त्या ओठावर लावून घ्या. आणि केसांना विरुद्ध दिशेला घेऊन हळूहळू काढून घ्या.

हे उपाय दररोज करत रहा. आणि त्यानंतरच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. आणि ह्या उपायांनी जर काहीच फरक पडला नाही तर आम्हाला सांगा. आम्ही पुन्हा नवीन उपाय सांगू. पण तुमची समस्या नक्कीच सोडवू. 

Leave a Reply

%d bloggers like this: