गरोदर असताना कसे झोपावे (व्हिडीओ)

गरोदरपण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील महत्वाची आणि नाजूक अवस्था असते. गरोदर असताना शरीराच्या काही आवश्यक गरजा असतात आणि तसेच या काळात काही आव्हाने देखील शरीरापुढे असतात. यामध्ये शरीराला योग्य आहार आणि विहार बरोबरच शांत झोपेची गरज असते. आणि हीच शांत झोप मिळणे या अवस्थेतील आव्हान ठरते. गरोदरपणात स्त्रीला साधारणतः रात्री ८ ते ९ तास झोप मिळणे आवश्यक असते. तसेच दुपारच्या वेळात १ ते २ तास झोप किंवा विश्रांती घेणे गरजेचे असते पुरेशी झोप न मिळणे हे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. झोपेच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. त्याकरता गरोदर असताना कसे झोपावे याचा पण व्हिडीओ पाहूया 

.     तुमच्या झोपण्याच्या पद्धतीचा तुमच्या बाळावर आणि तुमच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून या काळात कसे झोपावे हे लक्षात घेणं आवश्यक असते.

सर्वसाधारण काही गुंतागुंत नसणाऱ्या गरोदर स्त्री ने सुरवातीच्या काही दिवसात जो पर्यंत पोटाचा आकार वाढलेले नसतो तो पर्यंत अगदीच अस्वस्थ वाटत असेल तर काही काळ तुम्ही पाठीवर झोपू शकता. पण नंतर पाठीवर झोपणे शक्य होत नाही आणि डॉक्टर देखील या काळात एका कुशीवर झोपण्याचा सल्ला देतात.

या काळात झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. गरोदर महीलांसाठी झोपण्याची ही आदर्श स्थिती असते.जर या स्थितीत तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल तुमच्या पायाखाली उशी घेऊन झोपण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे तुमच्या पोटाला आधार मिळावा यासाठी एखादी छोटी उशी तुम्ही पोटाच्या आधारासाठी घेऊ शकता.

शेवटच्या काही महिन्यात गर्भाचा दाब जठारावर पडतो. त्यासाठी डोक्याशी उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दाब पडणार नाही व झोपही चांगली लागेल.

डॉक्टरांनी जर तुम्हाला या अवस्थेत झोपण्याच्या पद्धतीबाबत काही विशेष सल्ला दिला असेल तर वरील पद्धतींचा वापर करताना पुन्हा डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: