गरोदर राहिल्यानंतर पहिल्यांदा डॉक्ट्र काय विचारतात आणि काय प्रश्न विचारावे

  हे खूप नैसर्गिक आहे ज्यावेळी गरोदर आहात, हे कळतं आणि त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी डॉक्टरांकडे जाता त्यावेळी डॉक्टर काय सांगतील कोणत्या तपासण्या करायला सांगतील. सगळं नीट असेल ना असे विचार मनात येणे साहजिक असते. अश्यावेळी सामान्य काही टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात हे निश्चित करून डॉक्टरांकडं जाण्यात बराच काळ जातो. तुमची मासिकपाळी चुकल्यानंतर तुम्ही गरोदर असल्याचे असल्याची निश्चिती झाल्यावर डॉक्टर कडे जाणे आवश्यक असते. त्यावेळी तुम्हांला साधारणतः काय काय विचारतात आणि कोणत्या तपासण्या करायला सांगतात ते आपण पाहणार आहोत

कोणते प्रश्न विचारतात

-बीएमआय तपासणी केली आहे का ?

– गर्भाशयामधील परिस्थितीचा डॉक्टर अंदाज घेतात.

-स्तनाची तपासणी केली आहे का ?

-मासिकपाळीच्या शेवटची तारीख

-जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर त्याबाबत माहिती

-नैसर्गिक आणि काही कारणस्तव झालेला गर्भपात झाला आहे का?

-कश्याची ऍलर्जी आहे का?

-आरोग्याबाबत कौटूंबिक इतिहास

कोणत्या तपासण्या ?

या काळात बऱ्याच तपासण्या करण्यात येतात त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नसते. त्यापैकी पुढील काही तपासण्या सामन्यात करायला सांगतात

१. लघवीची तपासणी

या तपासणीच्या आधारे ते तुमची रक्तातील साखरेची पातळी, तसेच प्रोटीनची पातळी आणि आणि शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण आणि काही जिवाणू यांचे प्रमाण याद्वारे तपासले जाते

२ .रक्त तपासणी

तुमच्या रक्ताचे नमुने,रक्ततील आरएच स्थिती (लाल रक्त पेशींनी घेतलेली प्रथिने) ऍनिमिया नाही ना याबाबत अंदाज येतो. तसेच डॉक्टरांना आपल्या शरीराची अंतर्गत वातावरण जसे की ड जीवनसत्वाची कमतरता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती याबाबतचा अंदाज डॉक्टरांना रक्ततपासणी मधून येतो

३. अनुवांशिक आजाराबाबत तपासणी

या तपासणीच्या आधारे तुमच्या गुणसूत्रांमध्ये काही समस्या तर नाही ना ? जे बाळाला पुढे त्रासदायक ठरतील. आणि असतील तर त्यावर काही उपाय सुचवण्यात येतात

४. एस टी डी तपासणी

आपल्या बाळाचे जीवन आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे आणि आपण एसडीएस, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी सारख्या एसटीडी संक्रमित होणारे आजार असल्यास निष्काळजीपणमुळे त्या लहानग्यांचे आयुष्य पणास लागू नये म्हणून या तपासण्या करणे आवश्यक असते आणि ही टेस्ट डॉक्टर करायला सांगतात

५.पीएपी स्मीअर तपासणी

ही तपासणी गर्भाशयाच्या संदर्भात करतात. गर्भाशयात करण्यासाठी की तो कर्करोगजन्य काहीतरी विकसित होत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.

६. रक्तदाब आणि रक्ततीतील साखरेची पातळी

गर्भधारणे दरम्यान होणारे मधुमेहा नाही ना ? ही खात्री करून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.

 ७.प्रसूतीची तारीख निश्चित करतात

तुम्हांला गर्भधारणा झाल्याची तारीख माहिती असेल आणि शेवटची मासिकपाळी कधी आली यावरून डॉक्टर तुम्हांला तुमच्या प्रसूतीच्या तारखेचा अंदाज देतात त्यामुळे तुम्हांला या गोष्टी देखील विचारल्या जातात.

. गर्भावस्थेबाबत सूचना

एकदा डॉक्टरांच्या सगळ्या तपासण्या झाल्यावर. त्या/ ते तुम्हांला तुमच्या तब्बेतीनुसार परिस्थिती नुसार गर्भावस्थेदरम्यान काय-करावे-काय करू नये याबाबत सूचना देतात, कशी काळजी घ्यावी याबाबत देखील सूचना देण्यात येतात.  

Leave a Reply

%d bloggers like this: