तान्ह्या बाळांच्या सर्दी व खोकल्यावर सोपा आयुर्वेदिक उपाय !

 सामान्यतः तान्ह्या बाळाला सर्वात जास्त त्रास होता असेल तर तो आहे सर्दी आणि खोकला पासून. आणि आता पाऊस चालू असल्याने आणि वातावरण ढगाळ असल्याने सुद्धा खोकला आणि सर्दीचा बाळावर परिणाम होऊन बाळ आजारी पडतो आणि आपण घाबरून जातो. पण काही साध्या आयुर्वेदिक उपायांनी ही समस्या सोडविता येईल. आणि खरंतर पावसाळ्यात ह्याची समस्या बऱ्याच मातांना येत असते. जरासे वातावरण बिघडले की, इकडे झाली बाळाला सर्दी आणि खोकला. तेव्हा ह्यावर तुम्हाला घरगुती काय उपाय करता येईल की, ज्यामुळे बाळाला आराम मिळेल.

१) मध

  अर्धा चमचा मधाला एक कप पाण्यात मिसळून बाळाला पाजा. मध अँटिसेप्टिक आहे. आणि बाळाच्या नाजूक इम्यून सिस्टमला सशक्त करते. लक्षात घ्या हा आयुर्वेदिक उपचार १ वर्ष कमी वयाच्या बाळाला देऊ नये.

२) आले

हा आयुर्वेदिक उपाय खोकल्यासाठी खूप परिणामकारक आहे. ह्यासाठी काय करता येईल. उकळत्या पाण्यात थोडे आले टाकावे आले कमीच टाका. नाहीतर खूप कडू होईल. ज्यावेळी पाणी उकळायला लागते. तेव्हा एक चमचा मध त्यात मिसळून द्या. आणि नंतर त्याला थंड करून बाळाला पाजावे. ह्याचे प्रमाण एक कप प्रमाणे घेऊ शकता.

३) जादूचे मिश्रण १

पाण्यात थोडी क्रश केलेली लसूणच्या २ ते ३ पाकळ्या उकळून घ्या. आणि परत त्याला थंडे करून द्या. ह्या पाण्यात मध, लाल मिरची पावडर ( खूप कमी प्रमाणात चुटकी भर ) आणि निंबूचे काही थेंब, हे मिश्रण बाळाला द्यावे. बाळाचा खोकला ह्या उपायने नक्कीच कमी होईल.

४) जादूचे मिश्रण २

उकळत्या पाण्यात एक चिमूटभर हळदीचे पावडर टाकून त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. ह्या द्रावणात काही प्रमाणात गूळ किंवा तुप अर्धा चमचा ) आणि एक चिमूटभर मीठ मिसळून द्या. आणि ह्याचे प्रमाण सुद्धा एक कप किंवा ग्लास प्रमाणे घेऊ शकता. हे आयुर्वेदिक मिश्रण बाळाचा खोकला निघून जाईल. ह्यात हळद विविध प्रकारचे संसर्गाविरुद्ध लढते. आणि शरीरात असलेल्या सुजला कमी करते.

५) कैमोमाइल

एक कप गरम पाण्यात एक कैमोमाइल चहाचे पान १० मिनिटासाठी भिजवून ठेवा. आणि ह्या मिश्रणाला बाळाला प्यायला द्या किंवा पाजून द्या. आणि ही चहा १ वर्ष पुढे असलेल्या बाळालाच द्यावे. ही चहा बाळाला जर गळ्यात काही त्रास असेल किंवा गळाच्या संसर्गाविरुद्ध लढण्याचे काम करत असते.

हे सर्व उपाय करताना बाळाला एक वर्ष व्हायला पाहिजे. कारण काही वेळा बाळाला ह्या पदार्थांची ऍलर्जीही होऊ शकते. आणि हे उपाय सर्व आयुर्वेदिक आहेत. आणि ह्या उपायांनी बाळाला आराम मिळेलच. आणि नाहीच आराम मिळाला यार डॉक्टरांकडे घेऊन जावे. काही वेळा आपल्याही सांगता येत नाही की, बाळाला नेमके काय झालेय? 

 

Leave a Reply

%d bloggers like this: