प्रत्येक आईने ही मुल्ये आपल्या मुलाला शिकवावी

लहान मुलाचे आयुष्य त्याचे आई-वडील देत असलेल्या शिकवणीनेच दिशा घेत असते. त्यामुळे मुलांना काही मूल्य आपल्याला देणे गरजेचे असते. हल्ली समाजात घडत असलेल्या घटना बघता प्रत्येक आईने आपल्या मुलाला काही मुल्ये आपल्या मुलाला लहानपणीच शिकवणे आईचे कर्तव्य आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवावी अशी मुल्ये कोणती ती पुढे पाहणार आहोत

१. स्त्रीचा आदर करणे

सर्वात महत्त्वाचा धडा प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवायला हवा तो म्हणजे स्त्रियांचा आदर करणे. जसे तो आपल्या आईचा आदर करतो तसे त्याने सर्व महिलांचा आदर करावा. तसेच प्रत्येक मुलाने स्वतःच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याच्या सभोवताली सर्व स्त्रियांना विनम्र, आदरयुक्त वागणूक देणे

२. एकाच वेळी कठोर आणि मृदु कसे राहावे

आपण जगतो या समाजात, सर्व पुरुष मजबूत, उग्र आणि भावनाहीन असल्याचे मानले जाते. पण तसे तर एक मुलगा कठोर असतो, त्याचवेळी सभ्य आणि मृदु कसे असावे हे देखील त्याला माहित असणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या दोन्ही भावनांमधील गांभीर्य पटकन ओळखून त्यानुसार वेळेला प्रतिकिया देणे जमले पाहिजे.

३. प्रत्येकाला सामान वागणूक देणे

प्रत्येकाला समानतेने वागणूक द्यावी हे मुलाला शिकवण्यातील सर्वात महत्वाचे मूल्यांपैकी एक आहे. पुरुष आणि स्त्री हे दोघेही समान आहेत आणि त्याच पद्धतीने वागले पाहिजे. आणि सामान्यत: पुरुष स्त्रियांवर वर्चस्व गाजवतात त्यामुळे म्ह आपल्या मुलाला अशी वागणूक जाऊ नये याची काळजी घ्यावी तसेच आणि मुलींना समानतेने वागवावे याची शिकवण द्यावी

४. रडण्यात काही चूक नाहीये

रडणाऱ्या पुरुषाला मुलाला समाजत नेहमी कमी लेखले जाते. पण हे चुकीचे आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला रडण्यात काही चूक आणि कमी पण वाटण्यासारखे नाही हे शिकवावे. रडल्यामुळे मानसिकरीत्या भावना व्यक्त होण्यासाठी वाट मिळते. तसेच रडल्यामुळे मोकळे वाटते

५. हुशारीबरोबरच दयाळूपणाला प्राधान्य द्या.

जगात खूप हुशार लोकं आहेत पण ती सगळीच दयाळू नाहीत. माणूस हुशार बनू शकतो पण दयाळूपणा माणसात असणे गरजेचे असते. माणूस म्हणून जगताना हुशारी बरोबर माणसाने दयाळू असणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या मुलाला हुशार म्हणून बनवताना त्याला दयाळू असणे किती महत्वाचे आहे हे सांगा .

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: