बाळाची गर्भात हालचाल आणि तुम्ही !

गरोदर झाल्यानंतर बऱ्याच मातांना गर्भातल्या बाळाची हालचाल विषयी उत्सुकता व जिज्ञासा असते. गर्भात बाळाच्या हालचालीवरून तिला बरेही वाटत असते. आणि एखाद्या दिवशी बाळाने जर गर्भात हालचाल केलीच नाहीतर ती आई काळजीत पडते. “ आज नेमके काय झाले की, बाळाने काही हालचाल केलीच नाही.” तर ह्याविषयी प्रश्नही विचारला गेला होता. तेव्हा गर्भात कधीपासून बाळाची हालचाल होते. त्याविषयी सर्व माहिती ह्या ब्लॉगमधून जाणून घ्या.

१) बाळाची पहिली हालचाल तुम्हाला १६ व्या आठवड्यापासून ते २२ व्या आठवड्यांमध्ये पहिल्या वेळेस अनुभवास मिळते. ह्यात काही प्रमाणात बदलही होत असतो. कधी -कधी त्या आईला समजत नाही. की, गर्भात काही हालचाल झालीय असे. नंतर ती सवय झाल्यावर कळायला लागते.

२) पोटात गर्भाचे हलणे- ढूलणे ७ व्या व ८ व्या आठवड्यातच सुरु होऊन जाते. पण ते खूपच हलके असल्याने आईला समजत नाही. पण जेव्हा ह्या आई खूप शांत बसल्या असतात किंवा पहुडलेल्या असतात तेव्हा त्यांना हालचाल ऐकू येते.

३) हालचाल कशी असते ?

मातांनी, पहिल्या गर्भाची हालचाल ही, पॉपकॉर्न चे फुलणे, छोट्या मासासारखे पोहणे, किंवा फुलपाखरूच्या फडफडण्यासारखा आवाज येतो. असे सांगितले. सुरुवातीला भूक किंवा पोट दुखण्याने असे होते असे वाटेल पण हळूहळू बाळाचे पाय व हात मारण्यावरून समजायला लागेल.

४) गर्भात बाळाने कितीवेळा हालचाल करायला हवी ?

सुरुवातीला बाळाची हालचाल कमी व काही दिवसांनी जाणवेल. कारण बाळाच्या लातेत तेवढा जोर नसतो. पण दुसऱ्या त्रैमासिकानंतर समजायला लागते. म्हणून असे निश्चित सांगता येत नाही की, बाळ किती लाता मारेल.

५) प्रसूती येण्यापर्यंत बाळ लात मारते का?

नाही, तुमचे बाळ जितके मोठे होते तितके त्याला गर्भात जागा हवी असते. आणि त्याला लात मारायला कमी जागा मिळेल. म्हणून बाळ थोडे शांत होऊन जाते. पण ह्याचा अर्थ असा नाही की, बाळ आता निष्क्रिय झाले असेल. तर त्याचे सर्व शरीर आता काम करायला लागले असते.

६) बाळाच्या लातेवर लक्ष ठेवावे लागते का ?

ज्या वेळी तुम्ही तुमच्या हृदयाच्या तुकड्याकडून पहिली लात खातात तेव्हा त्वरित डॉक्टरांना भेटून घ्या. आणि काही विचारून घ्या की, किंवा अल्ट्रासाउंड स्कॅन करून घ्या. म्हणजे बाळ पोटात निरोगी आहे की काही समस्या आहे हे समजून जाईल. आणि काही बाळांना काही समस्या असेल तर त्याचे निवारण करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: