या गोष्टीमुळे योनीमधून विचित्र वास येतो

नैसर्गिकरित्या प्रत्येक स्त्रीची योनी ही वासरहित असते. पण नंतर वेगवेगळ्या काळात आणि सवयीच्या परिणामस्वरूप योनीतुन विचित्र वास येऊ लागतो. अशा वेळा येतात योनीचा विचित्र वास येतो आणि हे आहे ही कदाचित इंन्फेकशनचं लक्षणं आहे. आता तुम्हांला असे वाटू शकते की आपण केवळ एकटे आहात जे या त्रासमधून जात आहोत. पण नाहीये बऱ्याच स्त्रियांना हि समस्या असते. परंतु बऱ्याच स्त्रियां आपल्या योनिमार्गाबद्दल उघडपणे बोलू शकत नाही. कारण बऱ्याच स्त्रियांना या विषयावर बोलायला संकोच वाटतो. योनीच्या अश्या वाईट वासामागे अनेक करणे असू शकतात त्यापैकी साधारण आढळून येणारी करणे पुढील परिमाणे आहेत

१.तिखट/मसालेदार खाणे

तुमचे तिखट आणि मसालेदार खाण्यामुळे तुम्हांला जाणवणारी जळजळ ही तोंडावाटे आणि गॅसद्वारे देखील बाहेर पडत असते. मसालेदार खाण्यामुळे देखील तुमच्या योनीद्वारे वास येण्याची शक्यता आहे.

२. घट्ट कपडे

आपल्या देशात साधरणतः तापमान उष्ण असते आणि हे तापमान हाताळण्या पलीकडचे असते अश्या वेळी खूप घाम येत असतो आणि ज्यावेळी तुम्ही घट्ट कपडे घालता त्यावेळी घामचे बाष्पीभवन होण्यास जागा राहत नाही. आणि त्यामुळे तो तुमच्या कपड्यामध्येच राहतो.आणि त्यामुळे खाज आणि त्रास होतो. अशी अवस्था बराच वेळ राहिली तर त्यामुळे इंन्फेकशन होण्याची शक्यता असते.

३.साबण

तुमचे कपडे धुण्याचा साबण किंवा पावडर जर कपडे धुताना व्यवस्थित धुतले गेले नाही आणि ते जर कपड्यांवर तसेच राहिले तर त्यामुळे तुमच्या योनिला आणि त्या नाजूक भागाला खाज किंवा इतर प्रकारची ऍलर्जीं होण्याची शक्यता असते. आणि हि ऍलर्जी आणि खाज तशीच येत राहिली तर थोडे दिवसांनी त्यामुळे त्या भागाचा विचित्र वास येऊ शकतो.

४.समागमानंतर तरची स्वच्छता

समागमानंतर जर तुम्ही तुमच्या योनीची आणि त्या भागाची स्वच्छता केली नाही तर योग्य ती स्वच्छता न केल्यामुळे बॅक्टरीयाची वाढ होऊन योनी मधून विचित्र वास येण्याची शक्यता असते. तसेच खूप धाव-पळ आणि घामाच्या दिवसात योनीची योग्य ती स्वच्छता आवश्यक असते.

५. गर्भावस्था

गर्भवस्थेमध्ये स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडून येतात. गर्भावस्थेत स्त्रीच्या योनीमधील PH ची पातळी कमी -जास्त होत असते आणि त्यामुळे देखील योनीचा विचित्र वास येऊ शकतो.

६.अति स्वच्छता

योग्य ती स्वच्छता न केल्यास योनी आणि योनीच्या भागात विचित्र वास येत असतो. परंतु अति स्वच्छतेमुळे देखील नैसर्गिक ओलावा जाऊन काही समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे देखील विचित्र वास येऊ शकतो.

७. कॉन्डोम

कॉन्डोमच्या वापरामुळे आणि त्यातील काही केमिकल मुले देखील ऍलर्जीं होऊ शकते आणि या ऍलर्जींमुळे योनीचा आणि आसपासच्या भागाचा विचित्र वास येण्याची शक्यता असते  

Leave a Reply

%d bloggers like this: