गरोदरपणात ह्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते !

स्नायूंचे अचानक आखडणे, लचक भरली जाणे, पाय सुजून जाणे, आणि वैरिकोस वेन ( ही नस असते ती पायात आणि योनीत जोडलेली असते) आणि काही दुखणे ह्यात गरोदर स्त्री सहन करत असते. आणि खूप गरोदर स्त्रियांना व स्त्रियांना वैरिकोस वेन विषयी माहित नसते. आणि ही नस खूप महत्वाची आहे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तिच्या विषयी माहिती घेऊ.

१) अचानक स्नायू आखडणे किंवा लचक भरली जाणे

तुम्ही बसले असता किंवा काहीतरी करत असता आणि अचानक नसांवर नस चालून जाते. किंवा लचक भरली जाऊन खूप त्रास व्हायला लागतो. आणि त्यामुळे खूप स्नायूंना त्रास होतो. आणि रात्री हा त्रास खूप वाढून जातो. आणि अजूनही ह्याबध्दल माहिती नाही की, असे का एकदम अचानक होते. पण असे म्हटले जाते की, वाढत्या वजनामुळे, मेटाबोलिक डिसऑर्डर, किंवा एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे, खूप काम करणे, आणि शरीरात व्हिटॅमिनची कमी यामुळे होत असते.

२) ह्यासाठी काय करता येईल

दररोज हलका पायांची हालचाल करून घ्यावी. आणि पायांच्या हालचालीमुळे नस सुधारली जाते. त्याचा फायदा तुम्हाला प्रसूतीच्यावेळी होत असतो.

त्यासाठी तुमच्या पायांना सलग ३० वेळा मोडून सरळ करायचे. खूप सोपे आहे.

तुमच्या पायाला एका बाजूला ८ वेळा फिरवून दुसऱ्या बाजूला ८ वेळा फिरवायचे.

लचक कमी करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला जोराने ताणायचे.

३) एडिया सुजल्यावर उपाय

गरोदरपणाच्या वेळी स्त्रियांचे पाय, हाथ, आणि एडिया सुजून जातात. त्याचे कारण जास्त तरल पदार्थ जमा झाल्यामुळे होते. आणि ज्यावेळी तुम्ही जास्त वेळ उभे असतात किंवा जास्त वेळ बसून असतात तेव्हा ही समस्या येत असते. आणि ही सूज तुमच्यासाठी किंवा बाळासाठी हानिकारक नसते. फक्त ह्या सुजमुळे तुमचा जीव घाबरायला लागतो. आणि दुखण्याचा त्रास होत असतो.

खाली दिलेल्या गोष्टीवरुन तुम्ही ह्या समस्यांवर उपाय करू शकता.

१. खूप वेळ पर्यंत उभे राहू नका.

२. आरामदायक जाते घालून घ्या.

३. जितके प्रयत्न होतील तितका वेळ तुम्ही पायांना उंच भागावर ठेवत चला. दिवसाच्या अर्धा तास तुमच्या पायांना हृदयाच्या थोडे वरती ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे की, पलंग किंवा सोफ्यावर झोपताना उशीवर पाय ठेवावेत.

४. गरम दिवसात खूप पाणी पिणे.

५. सोबत मॅग्निशियम ची गोळी खायची पण ही गोळी घ्या अगोदर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या.

४) वैरिकोस वेन

वैरिकोस वेन ( नस ) जी असते ती सुजून जाते. आणि ह्याचा परिणाम पायांच्या नस सुजण्यावर होतो. आणि ही वैरिकोस वेन योनीच्या प्रवेशद्वारापाशी सुद्धा असते. पण बाळाला जन्म दिल्यानंतर ती ठीक होऊन जाते.

जर तुम्हाला वैरिकोस वेनचा त्रास असेल तर

१. खूप वेळ उभे राहू नका.

२. तुमचे पाय दुमडून बसू नका

३. खूप वजन वाढवू नका. त्यामुळे त्या नसेवर दबाव पडत असतो.

४. ज्यावेळी त्रास होत असेल तर पाय वरती करून बसावे.

५. उशीवर पाय ठेवून झोपावे.

६. शक्य झाल्यास थोडी पायांची हालचाल करावी. 

Leave a Reply

%d bloggers like this: