डॉक्टरांनी दिलेल्या तारखेनुसार बाळ जन्म घेते का?

संशोधनानुसार, ८० टक्के बाळ ही दिलेल्या तारखेच्या २ आठवड्या आधी किंवा २ आठ्वड्यानंतर जन्म घेत असतात. याचा अर्थ असा आहे की, डॉक्टरांनी जी तारीख दिली असेल त्या तारखेच्या आधीच तयार राहायचे. जेणेकरून ऐन वेळेस कोणती समस्या येणार नाही. आणि ह्या वेळेस कधीही डिलिव्हरी होण्याचे चान्सेस असतात तेव्हा डॉक्टरही ह्या दिवसात खूप अलर्ट रहायला सांगतात. त्याचे कारण हेच की, प्रसूतीची वेळ रात्री किंवा कोणत्याही वेळेला येऊ शकते. आणि ही तारीख कशी दिली जाते तर तुमच्या मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुनच्या ४० व्या दिवसाला सुरुवात झाल्यापासून ठरवतात. आणि काही वेळा दिलेल्या तारखेच्या २ आठवड्यानंतरही होऊ शकते.


१) जशी जशी डॉक्टरांनी दिलेली तारीख जवळ येते तशी ती स्त्री घाबरायला लागते. पण ह्या दिवसात खूप घाबरण्याची आवश्यकता नसते. पण तरीही ह्या दिवसात तुमची चीड-चीड वाढायला लागते. आणि पहिले गर्भारपण असेल तर खूप काळजी वाटते. पण ह्या दिवसात तुम्ही मानसिक स्थितीने सशक्त रहा. आणि तणावमुक्त असा. डिलिव्हरीत ह्या गोष्टीचा खूप फायदा होत असतो.


२) ह्या दिवसात लेबर पेन (प्रसूतीच्या कळा) सुद्धा खूप वाढून जातात म्हणून वाटते की, कधी हा त्रास निघेल माझ्या पोटातून असे वाटायला लागते. आणि ह्या दिवसात खोटे सिग्नल मिळतात. म्हणजे आताच मी प्रसूत होईल असे वाटायला लागते.


३) घरच्यांनाही वाटते की, ह्या दिवशी प्रसूत होईल आणि आपण बाळाला खेळवू पण तुम्हाला त्यांचा राग सुद्धा येतो की, मला किती त्रास होतोय त्याचे यांना काही वाटत नाही आणि ह्यांना बाळ पाहिजे. यात काही वाईट असा राग वाटत असतो की, ते दिवस तसेच असतात आता तर आई झालेल्या स्त्रियांना तर त्याचे हसूच येईल. म्हणून त्या अशा दिवसात तुम्ही असे वागत असाल तर त्याचे वाईट घेऊ नका. तर ते नैसर्गिक असते.


४) संशोधनानुसार ज्या स्त्रिया पहिल्या वेळेस आई होत असतात त्यांना ४१ व्या आठवड्यातच लेबर पेन येऊन जाते. आणि ज्या स्त्रियांना अगोदर लेबर पेन माहिती आहे त्या स्त्रिया ४० आठवडे आणि वरच्या ३ दिवसात बाळाला जन्म देतात. आणि ह्या कारणाने होते की, काही स्त्रियांची मासिक पाळीची सायकल मोठी किंवा कमी वेळेत होऊ शकते. ह्याबद्दल तज्ज्ञांचे मत आह की, जर तुमची प्रसूतीच्या तारखेपेक्षा उशीर होत असेल तर तुम्ही नैसर्गिक प्रसूतीला पसंती द्या. खूप गोळ्या आणि घेऊन लेबर मध्ये जाऊ नका.


५) पण काही डॉक्टर आणि हॉस्पिटल ही गर्भारपणाच्या ४१ आठवड्यानंतरच लेबर साठी पाठवून देतात. काही वेळा स्वतःच लेबरला जाणे हे स्वतःच्या प्रकृतीसाठी व बाळासाठी धोकादायक असते. जर डॉक्टर काही इमरजेंसी कारणांनी लेबर ला जाऊ देत असतील त्यावेळेस काही पर्याय नसतो. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही नैसर्गिक रित्या बाळ होण्यासाठी वाट पाहू शकता. 

Leave a Reply

%d bloggers like this: