तुमच्यात या गोष्टी असाव्या अशी तुमच्या पत्नीची इच्छा असते.

लग्नाच्या मजबूत नात्यासाठी पती आणि पत्नी दोघांकडून प्रयन्त करण्याची गरज असते. यामध्ये दोघांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. तसेच यात बऱ्याच लहान मोठ्या तक्रारीतसेच लुटुपुटुची भांडणे असतात. तसेच प्रेमाचे संवाद असतात. तसे या नात्यामध्ये सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या असतात. सुख दुःख. पण प्रत्येक पतीला या गोष्टी माहित नसतात की आपल्या पत्नीला आपल्या जोडीदाराला आपल्या कडून कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात. पुढील काही गोष्टी तुम्हांला तुमच्या पत्नीला तुमच्या कडून काय अपेक्षित असतात किंवा कोणत्या गोष्टी तुमच्यात असाव्या असं तुमच्या पत्नीला वाटतं याचा अंदाज तुम्हांला येईल

तुमच्या बाबतीतील विश्वास

प्रत्येक पत्नीला ही जाणीव की ते आपल्या पतीमध्ये कोणत्याही गोष्टीविषयी विश्वास ठेवू शकतात. पतीनं तिचा जिवलग मित्र असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तीला त्याची गरज असेल तेव्हा त्याने तिथे असावे. तीला आपल्या सुख आणि इतर गोष्टी बाबत त्याने तिच्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा असते

रोमांस /प्रणय

तुमचे लग्न कधीही झालेले असतो दोन दिवस पूर्वी दोन वर्षांपूर्वी तुमचे नटे खेळीमेळीचे आणि घट्ट राहण्यासाठी तुमच्या नात्यात थोडा तरी रोमांस कायम असावा असे तीला वाटत असते. तसेच तिच्या तुमच्या नात्यासंबधित महत्वाचे दिवस तसेच तिच्यासाठी महत्वाचे दिवस तुम्ही लक्षात ठेवावे. त्या दिवशी तुम्ही तिच्यासाठी छोटंसं का होईना काहीतरी विशेष करावं असे तीला वाटत असते

संवाद साधण्याची इच्छा असावी. 

कोणत्याही दृढ बनवण्यासाठी संवाद ही त्याची गुरुकिल्ली आहे. सतत फोन लॅपटॉप यामध्ये व्यस्त असणं मान्य आहे आजकाल सगळ्यांनाच कामाचा ताण जास्त असतो परंतु तुमच्यासाठी जासी जसं तुमची पत्नी वेळ काढत असते तसं तुम्ही देखील त्यांच्याशी वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असते.

वेळ 

तुमच्या पत्नीला तुम्ही दिवसातील अगदी थोडा वेळ तरी त्यांच्यासाठी काढावा मग तो काही मिनटे जरी असला तरी चालेल पण तुला वेळात फक्त तुम्हीच त्यांचे असावे असते त्यांना वाटत असते

सुरक्षितता

आपल्या पतीने आपल्याला प्रत्येक बाबती सुरक्षित ठेवावे असे वाटत असते. सगळ्या स्त्रियां आपली स्वतःची काळजी घेण्यास समर्थ असतात परंतु अशी वेळ आल्यावर आपल्या पतीने आपल्या पाठीशी ठाम असावे असे प्रत्येक पत्नीला वाटत असते, सगळ्या बाबतीत आपल्याला आपल्या पतीची साथ मिळावी असे तिला वाटत असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: