स्तनाविषयी या गैरसमजांवर विश्वास ठेवणे बंद करा

बऱ्याच वेळा या विषयांवर बोलायला संकोच वाटतो त्यामुळे या बाबतीत इकडून तिकडून ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यात येतो आणि स्तनाच्या बाबती बरेच गैरसमज स्त्रियांमधे आहेत. जे खरे नाहीयेत. आपल्याला अफवा आणि सत्य गोष्ट यांमधील फरक ओळखणे जमले पाहिजे. अश्या कोणत्या अफवा आणि गैरसमज स्त्रियांमध्ये आहेत हे आपण जाणून घेऊया.

१. सतत ब्रा घातल्यानेच स्तन व्यवस्थित राहतात 

हे खरं नाहीये, सतत ब्रा घातल्यामुळे तुमच्या सौंदर्यात वाढ होऊन तुमचे स्तन नीट-नेटके राहतात हि गोष्ट काही खरी नाहीये. उलट डॉक्टर असे सुचवतात की ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी ब्राचा वापर टाळा आणि मोकळेपणा अनुभवा,

२. दोन्ही स्तन सारखेच असतात

बहुतांश स्त्रियांचे दोन्ही स्तन वेगवेगळे असतात. पण हा फरक लक्षात न येण्यासारखं त्यामुळे दोन्ही स्तन मध्ये जर फरक आढळून आला तर घाबरण्यासारखे काही नाही. जर तुमचा डावे स्तन उजव्या स्तनांपेक्षा जर आकाराने मोठे असेल तर घाबरण्यासारखे काही नाही    बहुतांश स्त्रियांमध्ये ही गोष्ट आढळून येते.

३. स्तनपानामुळे स्तन सैल होतात

काही महिला आपल्या बाळाला स्तनपान करत नाही कारण त्यांना वाटतं की यामुळे आपले स्तन सैल होतील आणि आपल्या स्तनांचे आकारमानत फरक पडतो पण सैल होत नाही.परंतु जर बाळाला सुरवातीच्या दिवसात आवश्यक पोषण मिळाले नाही तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

४. ब्राची साईज बदलत नाही

तुमच्या ही गोष्ट लक्षात नसेल आली पण बऱ्याच वेळा तुमच्या ब्राची साईज तुम्हांला एकदम बरोबर बसते पण पण काही महिन्याने तीच साईज कमी-जास्त वाटत असते, त्यामुळे कमीत-कमी ६ महिन्याने वेगळ्या साईजची ब्रा घालणे आवश्यक असते. ब्राच्या साईज विषयी अभ्यासकांच्या अंदाजनुसार आयुष्यात स्त्रीला ६ प्रकारच्या साईजच्या ब्रा लागतात.

५. फक्त तारुण्याच्या काही वर्षातच स्तनाची वाढ होते

स्तनाची वाढ कधी होते याबाबत खूप समज-गैरसमज आणि अफवा आहेत. स्तनाची वाढ कधी होते याबाबत बरीच मते आहेत. फक्त तारुण्यातच म्हणजे १३-१९ पर्यंतच स्तनाची वाढ होते असा गैरसमज आहे तर असे नसून २० ते २५,२६ मध्ये देखील स्तनाची वाढ होऊ शकते. 

Leave a Reply

%d bloggers like this: