गर्भारपण आणि मधुमेह

संपूर्ण गर्भवती स्त्रियांपैकी काही स्त्रियांना प्रजजन काळात मधुमेहाची समस्या निर्माण होते. आणि ह्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असत पण त्याचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही. आणि ह्या कारणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. आणि ह्या गोष्टीला ‘हायपरग्लिशेमिया’ असे म्हटले जाते. आणि हा त्रास मुख्यत्वे गर्भारपणातच होत असतो. आणि हा त्रास गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, २४ ते २८ आठवड्याच्या काळात होत असतो. ह्याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होत असतो. बरेच ब्लॉग लिहिलेत पण गरोदरपणात मधुमेह ह्यावर लिहला नव्हता. आणि ह्याविषयी सुद्धा माहिती स्त्रीला मिळायलाच हवी. तेव्हा ह्याविषयी माहिती देणारा हा ब्लॉग.

१) जर स्त्रीला मधुमेह झाला असेल तर

मधुमेह असलेल्या स्त्रीची जर पाळी चुकलीच तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून त्यावर योग्य औषधोपचार करून घ्यावा. आणि सोबत नियमित तपासणी करण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.

१. जर तुमच्यात मधुमेहाचे प्रमाण कमी असेल तर आहार नियंत्रण ठेवून तुम्ही ह्यावर नियंत्रण मिळवू शकता आणि होणारा त्रास वाचवू शकता.

२. ह्या दिवसात उपाशी राहू नये नाहीतर रक्तातील साखरेचे प्रमाण घटून चक्कर येऊ शकता.

३. आणि मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्यास तेव्हा काही पथ्ये आणि व्यायाम करून ह्या गोष्टी नियंत्रणात आणाव्या लागतील. आणि ह्या दिवसात मधुमेह नियंत्रणाच्या गोळ्या दिल्या जात नाहीत कारण त्याचा गर्भावर परिणाम होऊ नये म्हणून.

२) गर्भारपणात असताना इन्शुलिनची मात्रा आवश्यकतेनुसार कमी अधिक करावी लागते. जसजसा गर्भ वाढत असतो तसे इन्शुलिनचे प्रमाण वाढवावे लागते. ह्या दिवसात वारंवार रक्त आणि लघवीची तपासणी करून इन्शुलिनचा डोस निश्चित करावे लागते. आणि इन्शुलिनचे प्रमाण कमी व अधिक करता येत नाही.

३) मधुमेह असलेल्या स्त्रीला धोके

१. मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होणे, रक्तदाब गरोदरपणात वाढणे, गर्भजल जास्त तयार होणे, काही वेळा अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण येऊ शकते अशा गोष्टी ह्या स्त्रीवर येत असतात.

काही वेळा गर्भपात होणे, मूळ पोटातच दगावणे अशीही समस्या येत असते.

४) ह्यावेळी काय दक्षता घ्यावी

१. बाळाचे वजन ४ किलोच्या आसपास असते. आणि वारेतून बाळाला पुरेसा रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे सिझेरियन ऑपरेशन करावे लागते.

ह्या ब्लॉगमधून तुम्हाला ह्याची तोंडओळख करून दिली. पुढच्या ब्लॉगमध्ये कोणत्या स्त्रियांमध्ये कोणत्या लक्षणावरून मधुमेह असू शकतो. ह्याविषयी माहिती  देऊ

Leave a Reply

%d bloggers like this: