जाणून घ्या मासिकपाळीतील रक्तस्रावाचा रंग काय सांगतो

महिन्यांची ती वेळ परत आली आहे ? तुम्ही मासिकपाळी पासून पळू शकत नाही. (जो पर्यंत तुम्ही गरोदर होत नाही ) मासिकपाळीच्या त्रासाला इतकं कंटाळतो की पुन्हा येऊ नये असं वाटत असतं पण नियमित मासिकपाळी येणे हे निरोगी असल्याचे लक्षण आहे. या दिवसात होणाऱ्या रक्तस्त्रावाचा रंग बऱ्याच वेळा वेगवेगळा असतो आणि या रक्तस्रावाचा बदलता रंग हा तुमच्या आरोग्याविषयी काही सांगत असतो. हा रंग काय सांगत असतो हे आपण पाहणार आहोत.

१. गुलाबीसर रक्तस्त्राव


जर तुमच्या मासिकपाळीच्या रक्त हे जर गुलाबीसर असेल तर याचा तुमच्या शरीरात एस्ट्रोजनची पातळी कमी आहे असल्याचे हा रंग दर्शवते. जर तुम्हांला असे जाणवले की तुम्हांला नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होत आहे आणि तो गुलाबीसर आहे तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक हालचाल केली आहे किंवा जास्त व्यायाम केला आहे किंवा तुमच्या शरीरावर आणि मनावर मोठ्या प्रमाणत तणाव आहे. त्यामुळे मनावरचा तणाव कमी करा शांत राहा.

२. पाण्याचे प्रमाण जास्त असलेला रक्तस्त्राव

संप्रेरकांचे असंतुलन किंवा ऍनेमीयामुळे (आरबीसीमध्ये कमी झाल्यामुळे), आपण आपल्या मासिकपाळीत रक्त निसर्गात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे असल्याचे लक्षात येईल. कदाचित हे तुम्ही खात असलेल्या पदार्थमुळे देखील हे असू शकते. अश्या रक्तस्त्रावामुळे कदाचित तुम्हांला वेदना होऊ शकतात. पण जर हे मासिकपाळी नंतर बरेच दिवस असा रक्तस्त्राव चालू राहिल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा याबद्दल सल्ला घ्या.

३. गडद लालसर रंग

जर मासिकपाळी होणारा रक्तस्त्राव जर गडद लालसर रंगाचा असेल तर शरीरातील एस्ट्रोजनची पातळी आवश्यकेपेक्षा जास्त वाढली असल्याचे हे लक्षण आहे. या काळात तुम्हांला थोडा -थोडा रक्तस्त्राव झाल्याचे आढळून येईल (ब्लड स्पॉट) पण यात घाबरून जाण्यासारखे काही नाही.

४. चॉकलेटीसर दाणेदार रक्तस्त्राव

हे प्रोस्टेजोनच्या या संप्रेरकांच्या असंतुलनाचा परिणाम आहे, यात विशेषत: एस्ट्रोजेनच्या अधिक पातळीमुळे आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या कमी पातळीमुळे होते. असे संप्रेरकीय असंतुलन होऊ नये व्हावे म्हणून सोडा, साखर आणि इतर जंक फूडसारखे पदार्थ कमी करावे जेणेकरुन संप्रेरकीय स्तर सर्वसाधारण राहील

५. राखाडी रंग मिसळलेले

मासिकपाळीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावात राखडी रंग मिसळल्या सारखा वाटत असेल तर हे संक्रमणाचे म्हणजेच इन्फेक्शन्स लक्षण असू शकते. हे कदाचित एस टी डी किंवा एस टी आय सारख्या संक्रमणाचे लक्षण असू शकते त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

६. स्वच्छ लाल रंग

स्वच्छ लाल रंगचा रक्तस्त्राव हे निरोगीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे तुमचे चालू असलेला दिनक्रम हा योग्य असून तो चालू ठेवण्यास काही हरकत नाही असे हा रंग दर्शवतो. त्यामुळे तुम्ही काळजी करण्यासारखे काही नाही फक्त चालू दिनक्रमात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या 

Leave a Reply

%d bloggers like this: