तुमच्या तान्ह्या बाळाची डोळ्याची काळजी ह्या प्रकारे घ्या

       तान्ह्या बाळांची डोळे खूप नाजूक असतात. आणि ज्यावेळी बाळ जन्मते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून काहीतरी चिकट पदार्थ बाहेर पडत असतो. आणि ह्याच चिकट पदार्थामुळे डोळे चिकटतात आणि आणि तुम्ही ते बघून घाबरून जातात, की, माझ्या बाळाला काही झाले का ? आणि असे वाटायलाच हवं कारण तुम्ही आई आहात. आणि कोणत्याही आईला आपल्या बाळाला कोणतीही समस्या आली तर ती तत्परतेने काळजी घेऊन सोडविते. अशाच एका आईच्या प्रश्नाने तान्ह्या बाळाच्या डोळ्यांवरही ब्लॉग लिहायला हवा, आणि तो ब्लॉग आज लिहला गेला.

१) बाळाची नजर पहिल्या महिन्यात अजिबात स्थिर नसते, ते कधी तिरळे बघते तर कधी वर बघतं. कारण त्याचा डोळ्यावर ताबा नसतो आणि त्याला सर्व जग नवीन वाटतं म्हणून तो एका कुतूहलाने बघतं असतो. म्हणून बाळ तिरळे आहे अशी समजूत करून घेऊ नका.

२) दुसऱ्या महिन्यात बाळाचे डोळे व्यवस्थित आणि स्थिर व्हायला लागतात, आणि जर तुम्हाला डोळ्यांचा त्रास असेल तर बाळाच्या आहारात व्हिटॅमिन अ असलेले पदार्थ घ्यावेत. ( लगेच नाही बाळ थोडं मोठं झाल्यावर) नाहीतर व्हिटॅमिन अ चे ड्रॉप्स डॉक्टरांना विचारून द्यावेत.

३) जर २ ते ३ महिन्यांनी बाळाचे डोळे तिरळे वाटत असतील तर त्यांची चिकित्सा करून घ्यावी. काही वेळा लहान मुलांनाही मोतीबिंदू होऊ शकतो लगेच घाबरून जाऊ नका कारण तसे खूप दुर्मिळ होते. पण काळजी घ्या.

४) अगोदर पूर्वीच्या वेळी आजी वातीवर चांदीची वाटी ठेवून काजळ घरातच काढून बाळाच्या डोळ्याला लावत असे. जर असे काजळ तुमच्याकडे असेल तर लावा पण त्यात कापराच काजळ तुपामधून अलगद डोळ्यात लावा. आणि काजळ दिवसातून एकदाच लावावे.

५) काजळ रात्री झोपताना घालून झोपवावे याच्यामुळे डोळ्याचे तेज आणि दृष्टी स्वच्छ होते.

काजळ बाबत डॉक्टर सांगतात की, लावू नका त्याचे कारण बाजारातले काजळमुळे इन्फेक्शन आणि खरखरीत असते म्हणून ते नाही सांगतात म्हणून घरचे व स्वच्छ काजळ लावावे. ह्याबाबत काजळविषयी अगोदर ब्लॉग दिलाच आहे.

६) नवीन जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यातून जो चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यासाठी कोमट पाण्याने पातळ फडके भिजवून बाळाचे डोळे पुसून घ्यावेत. आणि जर हा चिकट पदार्थ तर डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्यावे.

७) हरडा – बेहडा व आवळा ह्या त्रिफळाचे पाणी डोळे धुवायला वापरावे. तान्ह्या साठी इतके नक्कीच करा.

८) आणि जर लहान वयातच मुलाला चष्मा लागला तर व्हिटॅमिन अ असलेले पदार्थ मुलाला द्या. आणि लक्षात असू द्या डोळे तुमच्या तान्ह्यासाठी खूप अनमोल आहेत. म्हणून त्याची लहानपणापासूनच काळजी घ्या.

                                                       साभार-डॉ- नियती बडे चितलिया 

Leave a Reply

%d bloggers like this: