या गोष्टी तुमच्या लहान मुलांना कधीच बोलू नका

       आपण बऱ्याच वेळा आपण मुलांसमोर आणि मुलांना चुकीच्या गोष्टी बोलत असतो. कामाचा ताण किंवा काही वैयक्तिक समस्या किंवा मुलांचा ऐकणं अश्या बऱ्याच गोष्टीमुळे आपण चुकीचे बोलून जात असतो. पण याचा परिणाम मुलांचा मनावर खोलवर होतो. विशेषतः मुलांचे वय कोवळे असेल तर या वयात बोलल्या गोष्टी मनावर चुकीची वाक्य मनावर खोलवर परिणाम करतात आणि या गोष्टी आयुष्यभर त्यांच्या मनात राहतात. मग परिणाम स्वरूप ती खूप रागीट होतात.  

१)  माझ्याशी बोलू नकोस / मला एकटीला सोड

प्रत्येक आईला तिच्यासाठी एकटीसाठी वेळ आवश्यक आहे. परंतु आपण केवळ आपल्या स्वत: च्या कामामध्ये अडकून राहिल्यास आणि माझ्याशी बोलू नको मला माझे काम करू दे मला एकटीला सोड असे आणि आपल्या मुलांवर वारंवार बोलता तर आणि त्यांना समजून न घेतल्यास त्यानं तुमचे हे बोलणे त्रासदायक ठरू शकते त्यांना त्रास देऊ शकतो. काही अभ्यासामध्ये असे पुढे आले आहे की जर तुम्ही वारंवार आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केले, तर ते “आईशी बोलून काहीच उपयोग नाही” असे वाटू शकते. 

२) ”ए रडू नको /रडतोस कसला

आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांना रागवण्या पेक्षा दे त्यांना त्यांच्या रडण्याचे कारण विचारा त्यांना “तु का रडत आहेस ? मला सांगा “किंवा” घाबरू नको, मला काय झालं ते सांग असे बोलून त्यांना काय झाला आहे हे विचारा. ए रडू नको किंवा रडतोस काय असे बोलून त्यांचे खच्चीकरण करू नका. “कारण मुले स्वत: ला शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत अशामुळेत्यांना रडायला येते. अश्यावेळी त्यांना रागावलात तर त्याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होईल.

३) थांब पप्पांना येऊ दे मग बघू

आपल्या मुलांना धमकावण्यासाठी नव्हे तर त्यांच्या मुलांवर शिस्त लावण्याची ही एक अत्यंत लोकप्रिय ओळ आहे. पण जो पर्यंत आई किंवा बाबा घरी येत नाही तो पर्यंत, आपल्या मुलाला कदाचित त्याने काय चूक केली हे लक्षात देखील राहणार नाही शिवाय, त्याला बाबांनी शिक्षा देण्याची भीती दाखवणे हे चुकीचे कृत्य करण्याच्या अपराधापेक्षा मोठे आहे. हे कदाचित अप्रत्यक्षपणे आपल्या मुलाला सांगू शकते की आपल्याला त्यांच्या वागणुकीवर नियंत्रण नाही. 

४)  तु त्याचासरखा/तिच्यासारख का वागत नाहीस

स्पर्धा असणे ही चांगली गोष्ट आहे परंतु तुलना करणे हे चुकीचे आहे प्रत्येक मुल वेगळे असते.त्याच्यात त्याचे स्वतःचे असे गुण दोष असतात.त्याचा गुणांना वाव देऊन त्यालात्याची आवड अनो वेगळे पण जपण्यास मदत करणे हे पालकांचे काम असते .जर तू याचा सारखा का नाही किंवा तू तिच्यासारख्या का नाहीस असे जर सतत बोलत राहिलात तर त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल आणि आणि ही गोष्ट त्याचा भावी भविष्यासाठी घातक आहे

५) तू मूर्ख किंवा ढ आहेस

प्रत्येक मुलाची समज ही सारखीच नसते तसेच प्रत्येक मुलाची शिकण्याची गती देखील सारखीच नसते त्यामुळे त्याला मूर्खच आहेस, ढ च आहेस असे म्हणून त्याचे खच्चीकरण करू नका.आपल्या मुलांतील दोष समजावून घेऊन त्यावर काम करा आणि त्याचसाठी त्याची मदत करा.

लहान मुलांचे मन हे फार कोमल असते त्यामुळे त्यांना समजून घेणे गरजेचे असते अन्यथा मुलांच्या मनावर लहानपणी झालेल्या आघाताचे पुढे फार मोठे दुष्परिणाम होतात 

Leave a Reply

%d bloggers like this: