हे घरगुती उपाय तुमच्या केसांच्या समस्या दूर करतील

आजची जीवनशैली तसेच प्रदूषण आणि त्यामुळे बऱ्याच जणांना केसांच्या समस्या निर्माण होत आहे या समस्यांवर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे केसांची गळती थांबून केसांशी निगडित समस्या कमी होण्यास मदत होते. ते कोणते ते आपण पाहणार आहोत

१) कांद्याचा रस
 

हो कांद्याचा रस हा केसगळतीवर नियंत्रण मिळवण्यास कांद्याच्या रसाचा उपयोग होतो. कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. एक कांदा कापून त्याचा रस काढा आणि हा रस टाळूवर १५ मिनिटे लावून ठेवा. आणि नंतर सौम्य शाम्पूने किंवा शिकाकाईने केस धुवा. आणि नंतर केस वरोवर सुकू द्या किंवा टॉवेल ने हलकेच पुसा. ड्रायर ने केस कोरडे करू नका. हा रस काढतान काळजी घ्या कारण कांदा  तिखट असेल तर तुम्हांला रडू शकतो.

२) लसुण

केसांच्या समस्येवरील पारंपरिक औषधांमध्ये लसणाचा वापर आढळून येतो. लसणामध्ये देखील कांद्याप्रमाणे सल्फरचे प्रमाण आढळून येते. लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या, त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या. मिश्रण कोमट झाल्यावर हलक्या हाताने मिश्रण थोडे केसांच्या मुळांशी लावा. ३० मिनिटे तेल तसेच ठेवा आणि नंतर केस धुवा. असे आठवड्यातून दोनदा करा त्यामुळे नक्कीच फरक जाणवेल

३) नारळ/ खोबरे

केसांच्या सर्व समस्यांवर आणि केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या केसांच्या वाढीसाठी तसेच केसांचा पोत सुधारण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे केसांच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नारळाचे दूध हे केसांसाठी खूप उपयुक्त ठरते. एक दिवसाआड किंवा कमीत-कमी आठवड्यातून एकदा तरी खोबऱ्याचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा आणि रात्रभर तसेच असू द्या आणि सकाळी केस धुवा. तासाभराने केस धुऊन टाका. ओले खोबरे किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा. आणि ते रात्रभर ठेवा रात्री झोपताना त्याला काही ताई कापड वैग्रे बांधून झोपा अन्यथा मुंग्या येण्याची शक्यता असते. दिवसभर लावून दुपारी देखील धुता येईल

४) मेहंदी

खोबरे /नारळ याप्रमाणेच मेहंदीच्या पानांचा देखील केसांच्या समस्यांमध्ये मेहंदीची पाने उपयुक्त ठरतात. तसेच केसांना नैसर्गीकरित्या रंग देण्यासाठी देखीलमेहंदीचा वापर करण्यात येतो. केसांची मुळे घट्ट करण्यात देखील उपयुक्त मानण्यात येतात. २५० ग्रॅम मोहरीच्या तेलात ६० ग्रॅम मेहंदीची धुतलेली पाने पाने घाला. नंतर हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा आणि उरलेले तेल एखाद्या हवाबंद बाटलीत भरून ठेवा. कोरडी मेहंदी पावडर पावडर दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठवल्याने देखील फायदा होतो

५) जास्वंद

जास्वंद केसांना पोषण देतात, केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून देखील जास्वदांच्या फुलांचं उपयोग होतो. काही जास्वंदाची फुले कुटून ती खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा आणि कमीतकमी ३/४ तासाने कोमट पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .

६) आवळा

आवळा हा शरीरासाठी बऱ्याच प्रकारे उपयुक्त ठरतो. केसांच्याबाबतीत आवळा हे केस गळती कमी करतो त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट हे केसगळती थांबवण्यास मदत करतात आवळ्याचा अर्क किंवा पावडर लिंबाच्या/सध्या पाण्यात एकत्र करायाया आणि हे मिश्रण२/३ तास वाळे पर्यंत केसांवर राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा 

Leave a Reply

%d bloggers like this: