गरोदरपणात होणाऱ्या पित्ताला ह्या उपायांनी दूर करा

             गरोदरपणात खूप स्त्रियांना ऍसिडिटीची समस्या येत असते तेव्हा ह्यावर तुम्हाला खूप सोपे आणि साधे उपाय करता येतील ते पुढीलप्रमाणे 

१) हळूहळू खात चला

खरं म्हणजे, खूप वेळा तुम्ही कितीही ठरवले तरीही खूप वेगाने जेवण करत असतात आणि त्यामुळे काही साध्या गोष्टीचा त्रास अंगी बनवून घेतात. जसे की, ऍसिडिटी, छातीत खूप जळजळ होणे, त्यामुळे हळूहळू खात चला. आणि ज्या वेळा जेवणाच्या आहेत त्या – त्या त्यावेळी खायला पाहिजे.

२) पातळ पदार्थ घेत चला

रात्री खाल्यानंतर एक मोठा ग्लास दूध घ्यायचे. आणि जमलेस तर प्रत्येक वेळी खाल्यानंतर ज्यूस किंवा पातळ पदार्थ प्यायचा. दिवसातून काही आहार पातळ असू द्यावा. आणि तुमच्या शरीरात पाण्याची मात्रा चांगली राहील इतके पाणीही प्यावे.

३) प्रत्येक वेळी जेवण झाल्यावर थोडेसे फिरून घ्यायचे. घरातली कामे करत राहणे, पुस्तक वाचून एका स्थितीत बसून राहणे, आणि तुम्हाला झुकावे लागेल अशी काम ह्यावेळी टाळावीत. अशी जर तुमची ऍक्टिव्हिटी राहिली तर तुम्ही स्वस्थ व आनंदी राहणारच पण प्रसूतीही आरामशीर होईल व बाळही आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.

४) झोपण्याच्या अगोदर खूप पोटभरुन खाणे हे ऍसिडिटी वाढवत असते. म्हणून गर्भावस्थेच्या वेळी झोपण्या अगोदर ३ तासापूर्वीच जेवण करून घ्यावे. आणि डॉक्टरही तुम्हाला असेच सांगत असतात. कारण खाल्लेले व्यवस्थित पचायला हवे.

५) गर्भावस्थेच्या वेळी खूप तंग कपडे घालू नका. टाईट कपडे घालण्यामुळे शरीरावरती खूप दबाव पडत असतो तुम्ही त्यामुळेही अस्वस्थ होत असतात. ढिले कपडे घाला आणि हे कपडे पोटावर तितका दबाव पडत नसतो म्हणून आरामदायक वाटते. ह्या दरम्यान साडी घालणे टाळा.

६) गरोदरपणाच्या वेळी आले खात जा, आणि खाण्यातही आले व दालचिनीचा वापर करा. ह्यामुळे उलटी आणि चक्कर पासून तुम्हाला आराम मिळतो. आणि त्यातच ऍसिडिटीची समस्या राहत नाही. 

Leave a Reply

%d bloggers like this: