गरोदर न होण्यात हे महत्वाचे कारण असते…. 1

बऱ्याचदा गरोदर होण्यात खूप अडचणी येत असतात. आणि गरोदर होण्यात ज्या अडचणी येतात त्यात खूप काही गोष्टीचा अडथळा असतो. त्यात कोणत्या स्त्रीला कोणता अडथळा हे सांगणे थोडे कठीण असते. आणि गरोदर न होणे म्हणजे स्त्रीचाच दोष किंवा स्त्रियांमध्येच काही अडथळा असेल असे नाही त्यात पुरुषाचाही दोष असतो. म्हणून फक्त स्त्रीलाच दोष देता येत नाही. आता सर्वात महत्वाचे म्हणजे, गर्भ धारण होण्यासाठी egg (अंड्याची) गुणात्मक उपयुक्तता खूप महत्वाची असते. आजच्या ब्लॉगमधून त्याविषयीच माहिती जाणून घेऊ.

१) egg (अंडे) ची गुणवत्ता खूप महत्वाची असते कारण त्यावरच गर्भ धारण करण्याची गुणवत्ता व क्षमता ठरत असते. जर कमी प्रतीची अंड्याची (egg) दर्जा (क्वालिटी) असेल तर काही वेळा ते chromosomal abnormalities (जनुकीय असमानता किंवा विकृती) गर्भात असू शकते, ह्याला शास्त्रीय भाषेत aneuploidy असेही म्हटले जाते. काही केसेस मध्ये aneuploidy मुळे जन्मात बिघाड होतो, पण अनेकदा ह्यात गर्भपात होताना आढळून येते. आणि अनेकदा तर असेही घडते की, स्त्रीला मी गर्भवती आहे असेही समजून येत नाही.

२) IVF मध्ये, जर egg अंड्याची क्वॅलिटी मध्ये समस्या असेल तर परिणामस्वरूप गर्भाचे प्रत्यारोपण करता येत नाही, तर अंडेच त्या ठिकाणी अपयशी ठरत असेल तर ते फेर्टीलिटीच्या मध्ये अडथळाच येत असतो. आणि जर तुम्ही ह्यात गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर आणि IVF साठी प्रयत्न करत असाल. पण कसे तुम्ही ठरवू शकता की, तुमची egg अंड्याची गुणवत्ता ही गर्भ धारण करण्यासाठी हेल्थी आहे?

३) ज्या स्त्रियांचे वय ३५ पेक्षा जास्त असते त्यांना कमी अंड्याची गुणवत्ता(poor egg quality) अंडाशयातील ( ovarian reserve) कमी झाल्यामुळे होत असते. पण हे ३५ पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांबाबत घडून येते. (काही स्त्रिया सर्वच नाही)

४) जर तुमची egg quality कमी असेल तर तुम्ही ovarian reserve ची तपासणी करून घ्या. कारण ही टेस्ट diagnostic असते. त्यामुळे तुमची egg quality सुधारू शकते की, नाही त्यावरती तुम्हाला उपाय मिळून जातो. ovarian reserve वर सुद्धा काही उपाय करता येईल का त्यावरून समजू शकते. आणि सोबत egg quality ची लगोलग तपासणी करून घ्या.

५) ज्यावेळी स्त्रीचा जन्म होत असतो त्याचवेळी तिचे बीजाशयात आयुष्यभरासाठी egg मिळत असते. पण हळूहळू ह्या अंड्याची क्षमता कमी कमी होत जाते. पण ह्याची खूप कमी क्षमता ३० वयानंतर व्हायला लागते. आणि ४० पर्यंत खूप कमी होऊन गेली असते. म्हणजे ३५ पर्यंत तरी खूप काही धोका नसतो.

तेव्हा गरोदरपणासाठी सर्वच टेस्ट केल्या आहेत पण तरीही गर्भ राहत नाही तेव्हा त्यात अंड्याची क्षमताही तपासून घ्यावी लागेल. आणि ह्या अंड्याची क्षमता वाढवता येते त्यासाठी काय करता येईल ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू. आणि खूप घाबरून जाऊ नका तुम्ही तुमची egg quality आणि fertility ची क्षमता वाढवू शकता.

                                             साभार – Restoration Health (USA) 

Leave a Reply

%d bloggers like this: