जाणून घ्या प्लासेंटा प्रेवीया बद्दल.

आपल्या सर्वांना माहितीये की प्लासेंटा ही गरोदर स्त्रीच्या गर्भाशयात विकसित होणारी एक अशी रचना आहे जी बाळाला गरज असणाऱ्या सर्व प्रकारच्या पोषक द्रव्यांचा आणि ऑक्सिजन चा मुबलक पुरवठा करून देते. हा प्लासेंटा गर्भनाळीद्वारे बाळाला जोडलेला असतो. सामान्यपणे हा प्लासेंटा गर्भाशयाच्या वरच्या बाजूस जोडलेल्या अवस्थेत विकसित होतो. पण काही केसेस मध्ये हा प्लासेंटा अशाप्रकारे विकसित होतो की तो गर्भाशय ग्रीवाला (सर्विक्स) पूर्णतः किंवा अर्धवट झाकतो. या अवस्थेला जेंव्हा प्लासेंटा गर्भाशय ग्रीवाच्या उघडणाऱ्या तोंडाला (सर्वीकल ओपेनिंग) पूर्णपणे किंवा अर्धवट झाकतो त्यास ‘प्लासेंटा प्रीवीया’ असे म्हणतात.
आज उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून असं निष्कर्ष उत्पन्न झाला आहे की ही अवस्था आई होणाऱ्या २०० पैकी एका स्त्रीच्या गर्भाशयात आढळून येते. या अवस्थेचे एकूण ३ प्रकार आहेत. प्लासेंटा गर्भाशयात कोणत्या भागास संलग्न आहे व त्याने किती भाग झाकला जात आहे याच्या स्थितीवरून याचे कसे प्रकार पडतात ते खालील चित्रावरून तुम्हाला कळण्यास मदत होईल.

     

मार्जीनल प्रेवीया.

या स्थितीमध्ये, प्लासेंटा हा सर्विक्सच्या उघडणाऱ्या तोंडाबाजूलाच लागून विकसित होतो. पण यात सर्विक्स पूर्णतः प्लासेंटाला झाकून घेत नाही. ही एक हलकी समस्या आहे. यामुळे प्रत्यक्षात काहीही समस्या उद्भवत नाही परंतु कधी कधी मातेला अवघडल्यासारखे होऊ शकते.

पर्शियल प्रेवीया.

या स्थितीमध्ये सर्विक्सचा अर्धा भाग प्लासेंटाने झाकलेल्या अवस्थेत असतो आणि अर्धा भाग हा मोकळा असतो. ही स्थिती वरती सांगितलेल्या स्थितीपेक्षा जरा गंभीर आहे. यात मातेला गरोदर असताना रक्तस्त्राव होऊ शकतो. तसेच या स्थितीत मातेला थोडीफार समस्या वाटू शकते.

कम्प्लीट प्रेवीया.

या स्थितीमध्ये सर्विक्सचे संपूर्ण तोंड प्लासेंटा द्वारे झाल्केल्या अवस्थेत असते. यात गर्भाशयाला कोणतेच उघडे तोंड राहत नाही. यात गर्भावस्थेत असतांना बऱ्याचदा रक्तस्त्राव होऊ शकतो. ही एक गंभीर समस्या आहे. यात नॉर्मल म्हणजेच नैसर्गिकरीत्या प्रसूती होणे अतिशय अवघड असते. या स्थितीत गर्भाशयाचे तोंड बंद असल्याने बहुदा सी-सेक्शनद्वारे प्रसूती करावी लागते.

प्लासेंटा प्रेवीया ही गरोदर स्त्रियांमध्ये वरचेवर आढळणारी एक समस्या आहे. याविषयी मनात भीती बाळगण्याची गरज नाही. गर्भारपणात योनिद्वारे वारंवार होणारा रक्तस्त्राव हे प्लासेंटा प्रेविया चे लक्षण असू शकते. अशावेळी घाबरून जाऊ नका. तुमच्या डॉक्टरांना स्थिती सांगा ते नक्कीच यातून तुम्हाला मदत करतील.    

 

Leave a Reply

%d bloggers like this: