तुमच्या या गोष्टी तुमच्या पतीला आवडत नाहीत

विवाह जगात अस्तित्वात असलेला सर्वात पवित्र आणि सशक्त बंध आहे. पती-पत्नीच्यातील संबंधमुळे जग चालले आहे आणि जगाचे कार्य चालले आहे. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या बरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं ठरवलं असेल त्यावेळी आयुष्यात चढ-उतार येत असतात. आणि अश्यावेळी दोघांना एकमेकांच्या काही गोष्टी आवडत नाहीत. महत्वाच्या काही गोष्टी असतात ज्या तुमच्या पतीला तुमच्याबद्दल खटकत असतात आवडत नाही. पतीला तुमच्याबद्दल काय आवडत नाही हे जाणून घेणे अवघड आहे. परंतु काही गोष्टी आम्ही शोधून काढल्या आहेत ज्या सामान्यतः प्रत्येक पतीला आपल्या पत्नीबद्दल आवडत नाही. त्या कोणत्या ते जाणून घेऊ कारण कदाचित यात तुमच्या पतीला देखील न आवडणाऱ्या गोष्टी असतील.

१.  तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा 

कधी-कधी तुमचे पती तुमच्याबरोबर नसतात कारण त्यांना माहित असतं तुम्ही परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ आहे . आणि अश्यावेळी तुम्ही ज्यावेळी स्वतःवर विश्वास न ठेवता मागे हटता आणि त्याचा विश्वास तोडता ही गोष्ट त्याला आवडत नाही. ज्यावेळी त्यांना तुमच्यावर जास्त विश्वास असतो अश्याच वेळी तुम्ही माघार कशी घेऊ शकता असे त्यांना वाटते

२. दुःख वाटून न घेणे

आपल्या पत्नीला रडताना बघण्याशिवाय दुखवणारी गोष्ट पतीसाठी कोणतीच नाही. तुम्ही ज्यावेळी गुपचूप रडता त्याला काय झाले हे सांगत नाही. तुमच्या समस्यांमध्ये दुःखामध्ये त्यांना सहभागी करून घेत नाही त्यांना ही गोष्ट नक्कीच आवडत नाही.

३.स्वतःच्या शाररिक भावनांना आवर घालणे

आपल्या जोडीदाराबाबत वाटणारी शाररीक ओढ आणि प्रेम ही निस्वार्थी प्रेम दर्शविण्याची एक भाषा आहे. त्यामुळे तुम्हांला देखील ही ओढ वाटत असताना भांडण झाले आहे. बोलायचं नाही . आणि अश्यावेळी तुम्ही स्वतःला आणि पतीला दोघांना ज्यावेळी रोखता आणि स्वतःच्या भावनांना यावर घालता आणि त्याचाहत्यार म्हणून वापर करता त्यावेळी ही गोष्ट तुमच्या पतीला आवडत नाही.

४.ज्यावेळी तुम्ही त्यांच्या पासून लांब जाता

ज्यावेळी तुम्ही त्यांना शिक्षा म्हणून आईकडे किंवा त्यांच्यापासून लांब राहाता त्यावेळी त्यांना तुमची खूप आठवण येते आणि त्यांना ही गोष्ट आवडत नाही

५. ज्यावेळी तुम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न करता

तुम्ही आहात तश्याच तुमच्या पतीला आवडत असता म्हणून त्यांनी तुमच्यांशी लग्न केले असते. आणि पतीला असं आवडत असेल आणि कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयन्त करता त्यावेळी त्यांना ही गोष्ट आवडत नाही तुम्ही आहात. तश्या त्यांना आवडत असता. 

Leave a Reply

%d bloggers like this: