नवजात बाळाबाबत या गोष्टी करणे टाळावे

         तुमच्या बाळाचा जन्म झाल्यावर तुम्हांला रोज काय करावं आणि काय करू नये यांची यादी नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून मिळाली असेलच. बाळाला घट्ट बांधू नका. बाळाला बाहेर नेऊ नका बाळाला पुरेशी हवा/वारा लागू द्या. आणि बरेच काही…

या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या बाबतीत करू नका आणि कुणाला करू देऊ नका.

१. कोणालाही बाळाची पापी घेऊ देऊ नका.

जन्मानंतर पहिल्या काही आठवडयांमध्ये, आपल्या बाळाला आजार होण्याची जास्त शक्यता असते कारण ते जीवाणू व व्हायरसच्या बाबतीत संवेदनाशील असतात. म्हणून जेव्हा कोणी म्हणते ‘तुमचं बाळ इतका सुंदर आहे’, तु आणि असे म्हणल्यावर काय होणार माहिती आहे ना ? (स्मूच, स्मूच) तर हे टाळण्याचा प्रयन्त करा.त्यामुळे बाळाला इन्फेकशन होण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा कोणीतरी आपल्या बाळाला जवळ घेईल ओळखीचे आणि अनोळखी त्यावेळी ते हात-पाय धुवून आले आहेत की नाही याची खात्री करून घ्या. स्वच्छ असल्याचे सुनिश्चित करा.

२. बाळाला डॉक्टरांकडे नेण्याच्या वेळा न पाळणे

सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला डॉक्टरांनी बोलावलेल्या वेळी तपासणीसाठी नेणे हे आवश्यक असते. The तुमचे बाळा हे सुदृढ आणि निरोगी बाळा असेल पण त्याची होणारी वाढ योग्य पद्धतीने होते ना ? योग्य गतीने होते ना? बाळाचे वजन तसेच त्याचा आहार किंवा आहाराबाबतच्या तक्रारी या कारणांसाठी बॉल वेळच्यावेळी डॉक्टरांकडे नेणे गरजेचे असते. त्यामुळे बाळाच्या बाबतीत डॉक्टरांकडे न जाण्याचा हलगर्जीपणा करू नये

३. खराब डायपर जास्त वेळ बाळाच्या अंगावर ठेऊ नये

खराब झालेले डायपर जास्त वेळ जर बाळाच्या अंगावर राहिले तर त्याच्या नाजूक भागावर पुरळ उठण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे इन्फेक्शन देखील होण्याची शक्यता असते. तरी खराब झालेले डायपर लगेच बदलावे. तसेच खराब झाले असो किंवा नसो. ठराविक वेळाने बाळाचे डायपर बदलत राहावे बदल राहावे. शक्यतो सुरवातीचे काही दिवस आणि घरी असताना बाळाला डायपर न घालता घरगुती कापडाचे लंगोट बांधावे. त्यामुळे बाळाला मोकळं वाटते

४.पेसिफायर /चोखणी देणे टाळावे

ज्यावेळी तुमचं बाळ ज्यावेळी रडायला लागते त्यावेळी त्याला शांत करण्यासाठी स्तनपानाच्या ऐवजी पेसिफायर /चोखणी देऊ नये,नवजात बाळाला पेसिफायर चोखायला दिल्यामुळे बाळ त्याच्या स्तनपानाच्या /किंवा दुधाच्या वेळेबाबत गोंधळेल आणि त्याला योग्यवेळी दूध आणि पोषाहार मिळणार नाही त्यामुळे बाळाच्या बजणावर आणि तब्बेतीवर याचा परिणाम होऊ शकतो.

५. बाळाला सतत पोटावर झोपवू नका

नवजात बाळाला सतत पोटभर झोपवल्यामुळे त्याच पोटावर आणि छातीवर दाब येण्याची शक्यता असते त्यामुळे नवजात बाळाला श्वास घेण्यास अडसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला सतत पोटावर झोपवू नयेआणि विशेषतः नुकतंच जन्म झालेल्या बाळाला पोटावर झोपवू नये 

Leave a Reply

%d bloggers like this: