गरोदरपणात आठ्वड्यानुसार स्त्रीचे वजन किती असावे ?

गर्भारपणांत प्रत्येक आठवड्यानुसार स्त्रीचे साधारणतः कसे वजन वाढते ते पुढील माहितीच्या आधारे पाहणार आहोत. १० आठवड्या दरम्यान  काहीच वजन वाढत नाही

१० ते १४ आठवड्या दरम्यान  १.५ किलो

१४ ते २० आठवड्या दरम्यान    २.५ किलो

२० ते ३० आठवड्या दरम्यान  ४.५ किलो

३०-३६ आठवड्या  दरम्यान  २.७ किलो

३६ ते ३८ आठवड्या दरम्यान  १.० किलो

३८ ते ४० आठवड्यापर्यंत दरम्यान जास्त काही वजन वाढत नाही.

वरील माहितीच्या आधारे हे लक्षात येते की गर्भारपणामध्ये साधारणता १० किलो पेक्षा जास्त वजन वाढण्याची शक्यता असते

गरोदरपणात शरीरचे वजन या भागात विभागलं जाते

स्तनचे वाढलेले आकारमान – ०.५ किलो 

प्लेसेंटा- ०.७ किलो 

एमनीओटिक फ्लूइड- १ किलो 

वाढलेले गर्भाशय – १ किलो 

रक्ताचे वाढलेले प्रमाण १.५ किलो 

पाणी – २.५ किलो 

वाढलेले मेद /फॅट्स – २.५  किलो 

बाळचे अंदाजे वजन ३-४ किलो 

वरील वजनातील बदल बहुतांश महिलांमध्ये आढळून येतो काही महिलांमध्ये थोड्या-फार प्रमाणात फरक आढळण्याची शक्यता असते.

Leave a Reply

%d bloggers like this: