गरोदरपणात वजन वाढवण्यासाठी ह्या गोष्टी करा

ज्या स्त्रियांचे गरोदरपणात वजन खूप कमी असते. आणि त्यांना डॉक्टरही वजन वाढवायला सांगतात जेणेकरून प्रसूतीच्या वेळी खूप अडचण यायला नको. आणि काही स्त्रियांचे वजन प्रसूतीपर्यंत वाढतच नसते. आणि म्हणून बऱ्याचदा प्रसूतीच्या वेळी अडथळा येतो आणि डॉक्टर मग काही रिस्क न घेता सिझेरियन प्रसूती करून टाकतात. तेव्हा तुमचे वजन प्रसूतीचा तोल सांभाळू शकते इतके तरी ठेवायला हवे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आई, अनुभवी माता, डॉक्टर व नवरा सर्वच सांगत असतात पण आपण त्याला खूप मनावर घेत नाही. म्हणून खूप सोप्या पद्दतीने तुम्हाला तुमचे वजन वाढवता येईल ते कशाप्रकारे ते खाली ब्लॉग मध्ये दिले आहे.

१) पौष्टिक आहार घ्या


गरोदर स्त्रीला सकस आहार घ्यावा लागतो हे सर्वच गरोदर मातांना माहिती असते पण ते तुम्ही किती मनावर घेता हाही प्रश्न आहे. त्यामुळे घरात तूप तयार करत असाल तर ते घेत जा. जास्तीस्त जास्त दूध, आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. आणि ह्यांच्या खाण्याने लवकर वजन वाढते. आणि जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर खूप फॅटयुक्त पदार्थ खाल्यावर पाणी प्रमाणापेक्षा जास्त प्या.

२) दिवसभर थोडे – थोडे खात रहा

काही किंवा बऱ्याच स्त्रियांचे म्हणणे असते की, चांगले भरपूर जेवण होत नाही. आणि काहींना भूकच लागत नाही. तेव्हा थोड्या – थोड्या वेळानंतर खात रहा, पण जंक फूड सारखे अन्न घेऊ नका. ह्यामुळे तुमचे शरीर उर्जावान राहते आणि नैराश्यही येत नाही.

३) कॅलरीयुक्त जेवण घेत चला


फॅट्स, कार्बोहायड्रेट पासून वजन वाढवायला मदत मिळते. त्यामुळे तांदुळापासून बनवलेले पदार्थ, डाळ असलेले जेवण खात जा. त्याचबरोबर सुकामेवा सुद्धा घेत जा. त्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यासोबत तुमचे शरीर व मनही मजबूत होऊन गर्भातल्या बाळाला खूप फायदा होईल.

४) सॅलड अगोदर खाऊ नका


तुम्ही आईच्या घरी असतात म्हणून तुम्हाला अगोदरपासून सवय असते की, आई जेवण बनवते त्याच्याअगोदरच तुम्ही सॅलड किंवा इतर वरवरचे पदार्थ खायला लागतात. जर मुख्य जेवणाअगोदर सॅलड खातात तर तुमची भूक घटून जाते. आणि जेवण कमी करता आणि मग आई सांगते की, तू इतकेच खाते, खात जा. तेव्हा अगोदर सॅलड खाऊ नका.

५) तुमचे मन खुश होईल त्या गोष्टी करा


आपल्याकडे स्त्रियांना व्यायाम, किंवा भराभर चालणे, सकाळी उठून बागेत राहणे ह्या गोष्टी आवडत नाही. पण ह्या गोष्टीचा तुम्हाला व बाळाला आयुष्यभरासाठी फायदा होतो. आणि तुम्ही प्रसूतीच्या वेळी खूप खंबीर आणि मजबूत राहता. आणि ह्या शारीरिक क्रिया केल्यावर तुम्हाला आपोआप भूक लागते आणि खाल्लेले अंगाला लागते. 


म्हणून ह्या गोष्टीनाही वेळ देत जा. आणि तुम्हाला वाचन आवडत असेल, माहेरी मैत्रिणीशी गप्पा मारायला आवडत असेल, लोकर विणायला आवडत असेल ज्याही गोष्टी आवडत असतील त्या करा. ह्यामुळे जेवण चांगले जाते. 

Leave a Reply

%d bloggers like this: