नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नानाचे महत्व

दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले.अशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे

नरक चतुर्दशी ला सगळे पालक लवकर उठवून अभ्यंग स्नान करण्याच्या मागे लागतात पण तुम्हांला या अभ्यंगस्नानाचे महत्व माहिती आहे का ? या अभ्यंग स्नान पूर्वी पूर्ण शरीराला तेलाने मालिश केली. नंतर आयुर्वेदिक औषधीचे वापर करून तयार केलेल्या उटण्याने अंघोळ करण्यांत येते दक्षिण भारतात  बेसन, तेल आणि चंदन पावडरचा वापर करून अभ्यंग स्नान करण्यात येते

अभ्यंगस्नानचे फायदे

नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या पारंपरिक अभ्यंगस्नान हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. यावेळी साधारण सुगंधी तेलने मालिश करण्यात येते. दिवाळी ही थंडीच्या दिवसात येते. त्यामुळे शरीराला मालिश केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. आणि त्यामुळे शरीरातील पित्ताचे संतुलन राखण्यात येते. ही तेलाची मालिश शरीराला मॉश्चराईज करण्याचे देखील काम करते. थंडीच्या दिवसात आठवाड्यातून एकदा अभ्यंगस्नान करणे आरोग्यास उपयुक्त असते

यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि तेलाने डोक्याला मालिश केल्यामुळे ताण-तणाव कमी होऊन मन शांत होते. अभ्यंगस्नानाने सगळ्या नसांना अराम मिळतो. आणि सध्या मालिशमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि ते मजबूत बनतात.आणि उटण्याने केलेली अंघोळ ही त्वचेवरील मृतपेशीची स्तर काढायला मदत करतो. तसेच त्वचेची निगा राखायला मदत होते.

अभ्यंगस्नान कसे करावे

असे म्हणेल जाते नरकचतुर्दशी चांगल्याचा वाईटावर वरील विजयाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे.

१)थोडं तेल डोक्याला लावून हलक्या हातानं मालिश करावी.

२) त्यानंतर सगळ्या अंगाला चांगले तेल लावून मालिश करावी. मालीश झाल्यावर तेल अंगात मुरू द्यावे.

३) अंघोळ करताना अंगाला उटणं लावून हलक्या हाताने चोळून पूर्ण अंग स्वच्छ करावे

४) नंतर उरलेले उटणे पाण्याने स्वच्छ करावे

५) या दिवशी काही लोकं सुगंधी साबणाने अंघोळ करतात. जर उटण्याने अंग स्वच्छ झाले नाही तरच सौम्य साबणाचा वापर करा तरच अभ्यंग स्नानाचे महत्व आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: