अंतर्वस्त्रच्या बाबतीतील काही गोष्टी ज्या तुम्हांला माहित असणे गरजेचे आहे

१.  ब्राची साईज योग्य असावी 

तुम्हांला माहिती आहे जवळ-जवळ ६४ % स्त्रियां या चुकीच्या साईजची ब्रा घालतात. हे जरी वर-वर गंभीर वाटत नसलं तरी चुकीच्या साईजची ब्रा घालणे स्तनाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. अती घट्ट ब्रा स्तनांसाठी आणि इतर छातीच्या स्नायूंसाठी योग्य नसते. तसेच अती घट्ट ब्रामुळे पाठीवर ताण येऊ शकतो. तसेच चुकीच्या साईजची ब्रामुळे अस्वस्थ आणि वावरताना अवघड वाटू शकते. म्हणून तुम्हांला आरामदायक वाटेल अशी योग्य साईजची ब्रा वापर

२. थॉन्गबाबतचे अती प्रेम

थॉन्ग या खरंच सुंदर आणि आकर्षित करणाऱ्या असतात. आणि त्या तुम्हांला तुमचे आवडते कपडे घालताना त्याचा उपयोग होतोत्या सोयीस्कर ठरतात. पण खूप वेळ याचा वापरमुळे त्याचे घर्षण नाजूक भागांना होऊन त्यामुळे समस्या निर्मण होण्याची शक्यता असते तसेच सततचा वापरमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते . आणि जर तुम्ही गरोदर असाल तर इन्फेक्शन होण्याची ही शक्यता जास्त असते

३. नवीन ब्रा घेणे

कमीत-कमी साधारणता ६ ते ८ महिन्याने ब्रा बदलणे गरजेचे आहे. कारण या काळानंतर ब्राच्या इलेस्टीक आणि त्याची शिवण निघालेली असते. त्यामुळे ब्रा स्तनांना योग्यप्रकारे आधार देत नाही

४. अंतर्वस्त्राची काळजी

अंतर्वस्त्राची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या कप्प्यात जर तुमची अंतर्वस्त्र ठेवत असला तर ती जागा स्वच्छ असावी. हे कपडे धुतल्यावर या कपड्यातील साबण व्यवस्थित धुतला गेला आहे ना याची काळजी घ्यावी. अन्यथा यामुळे तुमच्या नाजूक भागांना इंफेक्शन किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. आणि या समस्यांना टाळण्यासाठी

५. व्यायामनंतर अंतर्वस्त्र बदला

व्यायाम केल्यानंतर अंतर्वस्त्र बदलावा तेच घालू नये. कारण यावेळी गुप्तांगच्या भागात येणार घाम तसाच त्या जागी राहून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

६. अंतर्वस्त्राचे कापड

सिल्क आणि सॅटिन या कापडाचे अंतर्वस्त्र दिसायला छान असतात पण काही वेळानंतर त्याचा शरीराला त्रास व्हायला लागतो ऍलर्जीं किंवा पुरळ येण्याची शक्यता असते . त्यामुळे शक्यतो कॉटनचे (सुती ) किंवा तुम्हांला सोयीस्कर असे कपड्याचे अंतर्वस्त्र वापरावे. सुती कपड्यामध्ये घाम आणि इतर स्त्राव टिपले जातात आणि त्वचा कोरडी राहते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे

७) घरी असताना /झोपताना सैलसर मोकळे कपडे घाला

घरी असताना / झोपताना शक्यतो अंतर्वस्त्र घालण्याचे टाळा पण जर शक्य नसल्यास मोकळे आणि सैलसर अंतर्वस्त्र घाला त्यामुळे तुम्हांला मोकळे वाटेल. त्यामुळे तुम्हांला शांत झोप लागेल.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: