फटाक्यांमुळे(आगी मुळे) भाजल्यावर कशी काळजी घ्याल

दिवाळी आहे दिवाळी म्हणालं पणत्या फटाके आलेच. अश्यावेळी लहान मुलांना कितीही आवरले तरी चटका बसणे,भाजणे अश्या गोष्टी घडत असतात. असा प्रसंग आलाच तर अश्यावेळी काय करावे आणि काय करू नये हे सुचत नाही प्रत्येकजण काही ना काही उपाय सांगत असतो त्यामुळे गोंधळ उडतो असा प्रसंग जर आलाच तर काय करावे आणि करू नये हे आपण पाहणार आहोत.

 हे करू नका ( गंभीर जखम असल्यावर )

भाजलेल्या जागी कधीही लोणी, पीठ किंवा खाण्याचा तेल, मलम इ. लावू नका

जखमेवर फोड आल्यास ते फोडू नका आणि गरजेपक्षा जास्त हात लावू नका

जखमेवर कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढू नका

काय करावे

भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवा. एखादी बादली किंवा किंवा नळातून येणाऱ्या पाण्याच्या हलक्या धारेखाली धरा.

थंड पाणी टाकण्याचा हा उपाय किमान १५ मिनिटे किंवा दुःख कमी होईपर्यंत करा.

काही अवयव पाण्यात बुडवणे शक्य नसते – उदा. भाजलेले तोंड – अशावेळी स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून वापरा. कापडाची ही पट्टी बदलत रहा मात्र भाजल्याची जागा तिने घासू नका. ह्यामुळे त्या भागातील ऊष्णता काढून घेतली जाईल आणि भाजल्यमुळे येणारे फोड टाळता येतील

भाजल्याच्या छोट्या आणि वरवरच्या जखमा हलक्या हाताने टिपून घ्या घासून पुसू नका . मात्र मोठ्या आकाराच्या आणि खोल जखमा, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, स्वच्छ व नुकत्याच धुतलेल्या व धागा न निघणाऱ्या (म्हणजे तो धागा जखमेला चिकटणार नाही ) कापडाने हलक्या हाताने झाकाव्या.

दोनअडीच सेंटिमीटरपेक्षा मोठी जखम असल्यास अश्यावेळी डॉक्टरांना बोलवा किंवा व्यक्तीला /मुलाला दवाखान्यात घेऊन जा.

  

 

Leave a Reply

%d bloggers like this: