स्ट्रेचमार्क्सच्या वेगवेगळ्या या टप्याबद्दल जाणून घ्या !

       

त्वचेवर येणाऱ्या स्ट्रेचमार्क्स बद्दल आपण थोडेफार नक्कीच ऐकले  असेल. गर्भावस्थेत जेव्हा त्वचा अति प्रमाणात ताणली जाते आणि त्वचेवर ज्या असमान खुणा उमटतात त्यांना ‘स्ट्रेचमार्क्स’ म्हणतात. अचानक त्वचा सैल पडल्यामुळे फाटलेल्या उती म्हणजेच स्ट्रेचमार्क्स  असतात.

स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या या स्ट्रेचमार्क्सचा रंग जांभळा,लाल आणि पांढरा ही असतो. आकडेवारीनुसार,१० पैकी ९ महिलांच्या शरीरावर हे व्रण  दिसून येतात आणि हे अगदीच साहजिक आहे कारण  गर्भावस्थेत स्त्रियांचे पोट खूप जास्त ताणले जाते.

कधीकधी गरोदर नसतांनाही स्ट्रेचमार्क्स होऊ शकतात. यात गंभीर किंवा काळजी करण्यासारखे काहीही नसले तरी तुम्हाला मधुमेह किंवा ‘cushing syndrome’ नावा समस्या असल्याचे हे एक लक्षण  शकते.

तुम्हाला हे माहित आहे का?

गरोदर महिला आणि किशोरवयीन मुलांना असे व्रण येण्याची जास्त शक्यता असते कारण एक विशिष्ट  शारीरिक अवस्था पार करताना भरपूर बदल होतात आणि यानंतर स्थिरता प्राप्त करण्यास शरीराला वेळ लागतो.

स्ट्रेचमार्क्सबद्दल स्त्रियांची मानसिकता काय असते?

कोणत्याही स्त्रीसाठी तिचे शरीर खूप महत्वाचे असते. शारीरिक सौंदर्याचे मापदंडांना अवास्तव महत्व न देता स्ट्रेचमार्कसह स्वतःचा खुल्या दिलाने स्वीकार करणे स्त्रियांनी आत्मसात करायला हवे.

स्ट्रेचमार्क्स पूर्णपणे टाळण्यासाठी स्त्रिया अर्थातच अनेक “खबरदारीचे उपाय”घेतच असतात. कोणत्याही उपायांनी हे व्रण पूर्णपणे टाळणे शक्य नाही कारण स्त्रियांच्या शरीराची जडणघडण निसर्गतःच अशी असते.

दुसरा प्रकार म्हणजे, अनेक स्त्रिया स्ट्रेचमार्क्स चा स्वीकार करू शकत नाहीत आणि यांना घालवण्यासाठी खूप संशोधन तसेच वयस्क स्त्रियांशी बोलून माहिती मिळवत असतात.

पण जेव्हा त्यांना जाणीव होते कि स्ट्रेचमार्क्सला थांबवणे शक्य नाही तेव्हा त्या “स्वीकार”करण्याची तयारी दर्शवितात कारण तोपर्यंत त्यांना लक्षात येते कि हे व्रण टाळता  येऊ शकत नाहीत.

स्ट्रेचमार्क्सला टाळण्याऐवजी स्त्रिया या व्रणांबद्दल सकारात्मक विचार करतात आणि त्यांच्या सुंदर शरीराचाच  एक भाग म्हणून याचे स्वागत करतात.

स्ट्रेचमार्क्सच्या विविध अवस्था (टप्पे) कोणत्या आहेत?

स्ट्रेचमार्क्सना कमी करण्यासाठी स्त्रिया अनेक उत्पादने वापरतात. पण कुठल्या अवस्थेत कोणते तेल किंवा क्रीम लावावे याची खूपच थोडी माहिती त्याना असते.

अनेकींना तर आपल्याला स्ट्रेचमार्क्स आले आहेत हे हि माहित नसते!!

-पहिली अवस्था

स्ट्रेचमार्क्स येतात तेव्हा सुरुवातीला ते गुलाबी रंगाचे असतात आणि तेथे थोडी खाज ही सुटते. तुमचे शरीर

ताणल्या जाण्याच्या प्रक्रियेला तेवढेसे सरावलेले नसते यामुळे व्रण उमटलेला शरीराचा भाग ओघळलेला आणि काहीसा सपाट दिसायला लागतो.

दुसरी अवस्था

या अवस्थेत हे व्रण जाडी आणि लांबीने वाढतात आणि तुमच्या शरीरानुसार यांचा रंग लाल, जांभळा होतो.

तिसरी अवस्था

स्त्रचमार्क्स ची हि शेवटी अवस्था असते ज्यात व्रण पक्व होतात आणि त्यांचा लालसर /गुलाबी रंग निघून जातो. बाळाचा जन्म झाल्यानंतर हे व्रण चंदेरी किंवा पांढऱ्या रंगाचे बनतात आणि पुसट होऊन फिके पडतात.

या वेळेपर्यंत स्ट्रेचमाक्स बरेच खडबडीत आणि आकाराने असमान बनतात.

मानवी शरीरावर स्वतःचे अस्तित्व कायम ठेवणारे हे व्रण चांगल्यासाठीच असतात. एक स्त्री किती निःस्वार्थ असते हेच स्ट्रेचमार्क्स दाखवून देतात. कधीकाळी अगदी नितळ असणारे शरीर आता कधीच न मिटणाऱ्या खुणांनी गोंदवले आहे .      

स्ट्रेचमार्क्स पासून मी काय शिकायला हवे?

सरतेशेवटी,अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे,आयुष्यात येणाऱ्या बदलांचा सकारात्मकतेने स्वीकार करायला हवा. सौंदर्य हे बघणाऱ्याचा दृष्टिकोन आणि आपल्याला मनात असते . तुम्ही अगदी निःस्वार्थ असणारी असामान्य  स्त्री आहात जि स्वतःच्या  शरीरात होणाऱ्या बदलानी अस्वस्थ होते आणि तरीही त्यांचा  स्वीकार करण्याची तयारी असते !

खऱ्या अर्थाने तुम्ही एक अद्भुत महिला आहेत !!!

Leave a Reply

%d bloggers like this: