लक्ष्मी पूजन साजरे करताना . . .

दिवाळीत लक्षमीपूजन करण्यात प्रत्येक घरातली आई मग्न असते. रांगोळी काढणे, झेंडूची फुले, दिवे, दिव्यांची आरास सर्व गोष्टीचे नियोजन करणे आणि सोबत घरच्यांनाही, पाहुण्यांनाही सर्वच व्यक्तींना वेळ देऊन सर्व कामे उरकणे. ह्या सर्व गोष्टी अतिशय नियोजन बद्ध करून ती एक व्यवस्थापन तज्ञ् आहे असेच सिद्ध करते. तेव्हा आज लक्ष्मी पूजनासाठी असलेला हा ब्लॉग.

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.

प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा, आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी)  सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजनाचा विधी आहे. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी आज, गुरुवारी अश्विन कृष्ण अमावास्येला सायं. ६.१२ ते रात्री ८.३९ असा मुहूर्त आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळी . उद्या, शुक्रवारी सकाळी ६.३५पासून सकाळी १०.५६पर्यंत शुभ चौकडी मुहूर्तवेळ मात्र पुढील वर्षी ज्येष्ठ अधिक मास येणार असल्याने बलिप्रतिपदा १९ दिवस उशिरा येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: