घरगुती फॅरेक्स असे बनवा

बऱ्याच आधुनिक मातांनी प्रश्न केला की, घरगुती फॅरेक्स बनवता येईल का ? जेणेकरून बाळाला पोषक घटक त्यातून मिळतील आणि बाळाची वाढही चंगली होईल. जसे मागच्या काळी असायचे तसे. तेव्हा तुम्हीही घरगुती फॅरेक्स बनवू शकता. आणि बाळाला ह्यातून खूप पोषक घटक मिळत असतात. म्हणून तुम्हीही घरगुती फॅरेक्स करून बघा.

१) त्यासाठी काय साहित्य घ्यावे लागेल

नाचणी, बाजरी, ज्वारी, उकडा तांदूळ घ्यायचा, उडीद, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ एक वाटी, वेलदोडा १० ग्राम, खसखस २५ ग्राम,

ही सर्व सामग्री घेऊन ठेवावी.

२) ह्यापासून घरगुती फॅरेक्स कसे बनवावे

कृती

१. वरती दिलेली सर्व धान्य व्यवस्थित भिजवून घ्यावीत. आणि त्यानंतर एकत्रित करून त्याचे दळण दळून घ्यावे. त्यात वेलदोडा, बदाम, खसखस ह्यांची पूड घालावी. तुमचे घरगुती फॅरेक्स तयार झाले.

२. आणि आता बाळाला ज्यावेळी लागणार त्यावेळी एक किंवा दीड चमचा वरील मिश्रण १ वाटी पाण्यात उकळी आणून शिजवून घ्यावे. व त्यात थोडी साखर दूध घालून बाळाला पाजावे.

३. तुमचे बाळ सहा महिन्याचा पुढे असलेले पाहिजे आणि हे फॅरेक्स तुम्ही १२ महिन्यापर्यंत देऊ शकता. त्यानंतर ही देऊ शकता पण बाळ इतर पदार्थ खायला लागते. म्हणून गरज पडत नाही. आणि हे घरगुती फॅरेक्स भारताच्या दक्षिणेकडील राज्यात बाळांना दिले जाते. महाराष्ट्रातही काही ठिकाणी दिले जाते.

हे मुलांसाठी पौष्टिक आणि पचायला हलके आहे. ज्यावेळी बाळ काही खात नसेल त्यावेळी बाळाला हे आवर्जून द्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: