डाळिंबाचे उपयोग

गोड डाळिंब ही त्रिदोषहारक, तृषा, दाह आणि तापात फायदेशीर असतात तसेच ज्यांना पिक्त्ताचा त्रास होत असेल त्यांना ही अगदी फायदेशीर आहेत. गोड डाळिंब ही बल व बुद्धि वाढवणारी असतात व प्रबळ पितकारक त्रिदोषांना नष्ट करणारी असतात. आंबट-गोड डाळिंब ही वायू प्रकृती असणाऱ्या लोकांना उत्तम आहेत. त्यामुळे वायू व कफ दूर होतो तसेच हृद्य, रुची, उत्पन्न करणारी असतात.

१) “पित्तशामक 

डाळिंबाचा रस पीतशामक असतो व त्याच्या रसाने उलटी होणे बंद होते. जेवणातील अरुची, खोकला, डोळ्यांची जळजळ, बेचैनी वाटणे ह्या तक्रारी दूर होतात. डाळींबाचे सरबत घेतल्याने शरीरातील उष्णता नष्ट होते. उन्हाळ्यात  ह्याचे सरबत घेतल्याने डोके दुखत असेल तर थांबते. डाळिंब हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. तसेच त्याने आपले स्वरयंत्र सुधारते व आपल्या शरीरात एक प्रकारची चेतना येते.नेहमी ताजे डाळिंब घ्यावे व त्याचा रस काढून त्यामध्ये खडीसाखर घालून प्याल्याने कोणताही प्रकारचा पित्तप्रकोप शांत होतो. डाळिंबाचा रस घेवून त्यामध्ये मीठ व मध घालून घेतल्याने अरुची दूर होते. घसा बसलेला असल्यास डाळिंबाचा रस घेतल्याने तो बरा होतो. डाळिंबाचे साल तोंडात घेवून त्याचा रस चोखल्याने खोकला नाहीसा होतो. डाळिंबाचा रस व साखर सम प्रमाणात घेवून मिक्स करून घेतल्याने छातीत दुखत असेल तर ते थांबते. डाळिंबाच्या रसाने गर्भवती महिलेची उलटी थांबते.

२. तुमच्या हृदयाचा मित्र

हृदयाच्या आरोग्यासाठी डाळींबाचा रस अतिशय उपयुक्त आहे. हृदयविकारापासून दिलासा देण्याचे काम डाळींब करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. कॉलेस्ट्रॉलवर डाळींब नियंत्रण ठेवत असल्याच्या नोंदी संशोधकांनी केल्या आहेत.

३. कर्करोग आणि मधुमेहापासून संरक्षण

डाळिंबामधील औषधी गुण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर रोगांपासून दूर राहण्यासाठी उपकारक आहेत.

४. त्वचा तजेलदार ठेवते

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. संतुलित आहारासोबत नियमित डाळींब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.

तर मग हे औषधी चविष्ट आणि रसदार फळ खाण्यात हरकत ती कोणती.

Leave a Reply

%d bloggers like this: