तुमच्या साथीदाराचे वागणे आणि त्यामागील अर्थ!


आपण सगळेच आजकाल हावभावांचा खेळ चपखलपणे हातळायला शिकलो आहोत. कधी, कुठे आणि कशी प्रतिक्रिया द्यायची ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना आपण सांभाळू शकू हे सहवासाने सर्वांना समजते. काही लोकं या बाबतीत त्यांच्या चेहऱ्यावर खोटे मुखवटे चढवतात पण दुर्दैवाने माणसांमध्ये  काही गोष्टी अशा असतात ज्यातून हे लपवता येत नाही. अशात तुमच्या जोडीदाराच्या वागण्यातून तुम्ही गोंधळून जात असाल.
पण आज आपल्याकडे ‘देहबोली’ या विषयावर खूप प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. आणि आता हे सिद्ध देखील झाले आहे की तुमची देहबोली तुमच्याबद्दल खूप काही सांगून जाते. तुमच्या देहबोलीतून तुम्ही तुमच्या उद्देशांना व्यक्त करत असता. इथे अशाच काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुमच्या जोडीदाराच्या  रोजच्या वागण्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगू शकतात.

१. तुमचा चेहरा.

जेंव्हा एक पुरुष प्रेमात पडतो तेंव्हा तो नक्कीच त्या स्त्रीशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संबंध निर्माण करण्यास प्रयत्नशील असतो. स्त्रीला शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न तर त्याच्याकडून नक्कीच होतो. तेंव्हा जर तो तुमच्या गालांवरून हात फिरवत असेल आणि नजर मिळवत असेल तर तो तुमच्या प्रेमात आकंठ बुडलेला आहे !
जर तुमचा जोडीदार थोडा लाजाळू असेल तर काही ना काही कारण काढून तुम्हाला स्पर्श करण्याकडे त्याचा कल असतो म्हणजे विनाकारण धूळ झटकण्यासाठी किंवा कपाळावरील केस बाजूला सारण्यासाठी वगैरे कारण काढून तो तुम्हाला स्पर्श करेल.
२. तुमचे केस.तुमच्या जोडीदाराला तुमच्या केसांशी खेळण्याचे असंख्य मार्ग शोधायचे असतात. हो. पुरुषांना तुमचे चमकणारे लांब केस खूप आवडतात आणि त्यांना त्यांच्यावरून हात फिरवणे आवडते. तेंव्हा जर तुमचा जोडीदार वेळोवेळी तुमच्या केसांशी खेळत असेल तर तो यावरच्या तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. तुम्ही त्याच्यासोबत किती कम्फर्टेबल आहात हे त्याला बघायचे आहे. यात तुम्हाला त्रास देण्याचा त्याचा काहीच हेतू नाही!
३. तुमचे हात.


जर तुमचा जोडीदार अचानक अलगद तुमचा हात त्याच्या हातात घेत असेल तर तो स्वतःला तुमच्याशी बांधील असल्याचे मानतो आणि तुमच्या सुरक्षेबद्दल सजग आहे. त्याच्या या हात पकडण्याच्या पद्धतीवरून खूप काही कळते! खूप काही! म्हणजे त्याने जितका पक्क आणि हक्काने तुमचा हात पकडला आहे आणि त्याच्या वेळोवेळी तुमच्या हाताचे चुंबन घेण्यावरून त्याचे तुमच्यामध्ये गुंतत चाललेले मन तुम्ही ओळखू शकता.

४. तुमचे पाय.


जर तुमचा जोडीदार खरच तुमच्यात गुंतला असेल तर तो तुम्हाला स्पर्श करण्याचे आणि संबंध प्रस्थापित करण्याचे सगळे प्रयत्न करेल. ज्याप्रकारे तो तुमचा हात हातात घेतो, तुमच्या पाठीवर हात ठेवतो त्याचप्रमाणे तो बोलताना तुमच्या मांडीवर हात ठेवेल, कधी उशी म्हणून डोके ठेवेल.
सामन्यात: पुरुष तुमच्या मांडीवर हात ठेवतात ते हे बघण्यासाठी की तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता. तुमची प्रतिक्रिया त्याची पुढची कृती ठरवते.

५. तो ज्याप्रकारे तुमच्याकडे बघतो.


असे म्हणतात, तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीकडे बघता तेंव्हा तुमच्या डोळ्यातील बुबुळे लगेच मोठी होतात. जर त्याच्याकडून तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असेल तर तो नक्कीच तुमच्या प्रेमात आहे. जर तो तुमच्याकडे प्रेमाने बघून तुम्हाला मोठ्ठी स्माईल देत असेल तर हे पक्के आहे की तो तुमच्यात गुंतत आहे.

६. भुवया उंचावणे.

‘मी ऐकत आहे’ यासाठी नेहमीच एक देहबोली असते. सामन्यात: पुरुष ऐकण्याचे काम करतात आणि स्त्रिया बोलत असतात. जर तुम्ही बोलतांना तुमचा जोडीदार मधून मधून त्याच्या भुवया उचावून तुमच्याकडे बघत असेल तर याचा अर्थ आहे की तो संपूर्ण एकाग्रतेने तुमचे बोलणे ऐकत आहे आणि त्याला तुमचे ऐकण्यात इंटेरेस्ट पण आहे!

७. सोशल मिडिया.


तंत्रज्ञान प्रगतीमुळे आजकाल सोशल मिडियाचे प्रस्थ वाढले आहे. अनेकजण फेसबुक, व्हाटसअप यावरून देखील मोठ्या प्रमाणात संपर्क साधतात. जर प्रत्यक्ष संपर्क साधणे शक्य नसेल तर तुमचा जोडीदार या मार्गांनी नक्कीच तुमच्याशी संपर्क ठेवतो. तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला तुमचा जोडीदार मधून मधून एखादा मेसेज करून तुमची विचार्पूस नक्कीच करेल.

तुमच्या साथीदाराला त्याच्या कृतींमधून त्याचे प्रेमच व्यक्त करायचे असते. ते ओळखा ! आणि त्याला तशीच प्रेमळ प्रतिक्रिया दया. कारण बोलून दाखवण्यापेक्षा कृती केंव्हाही प्रभावी असते!  
         

Leave a Reply

%d bloggers like this: