तान्ह्या बाळाला ढेकर येत नसेल तर हे करा.

            तुमचे बाळ स्तनपान केल्यानंतर खूप चीड चीड करते का ? आणि चीड चीड केल्यावर खूप रडतो. तुम्ही विचार केला आहे का की, हे कशामुळे होत असेल. ज्यावेळी बाळ दूध पीत असते त्यावेळी बाळ दूधाबरोबर हवाही घेत असते. तान्हे बाळ असल्याने सामान्यतः दूध पिताना हवा घेणारच आहे. तेव्हा बाळ ह्यामुळे चीड चीड आणि रडते. ह्यासाठी बाळाला ढेकर येईल अशा गोष्टी कराव्या लागतील. आणि जोपर्यन्त बाळाचे पोट साफ होत नाही तोपर्यँत बाळ नीट खात नाही. आणि आई खूप चिंतीत होते.

१) ढेकर का द्यायला हवी ?

तुमचे बाळ स्तनपान किंवा फॉर्मुला मिल्क घेत असेल तर दूध पिताना हवा पोटात घेतो आणि ती हवा पोटात गेल्यावर बुडबुड्या सारखी पोटात साठून राहते. आणि बाळ त्यामुळे अस्वस्थ होते. त्यामुळे बाळाचे स्तनपान झाल्यावर बाळाने ढेकर द्यायला हवी. आणि ढेकर हा स्तनपानाचा खूप महत्वपूर्ण भाग आहे.

२) ढेकर देण्यासाठी असलेले उपाय

१. अगोदर तुम्ही बसून घ्यावे त्यानंतर बाळाला आपल्या मांडीवर घेऊन पालथे करावे व त्यानंतर हळूहळू त्याची पाठ थोपटावी. त्यातून बाळ ढेकर द्यायला लागते. आणि काही वेळा ढेकर येत नसेल तर थोडी जोराने थपकी मारावी.

ह्यावेळेस बाळ उलटीही करू शकतो म्हणून जवळ स्वच्छ कापड ठेवावे.

२. तुमच्या खांद्यावर : तुमच्या बाळाला खांद्यावर घ्या आणि त्याला एका हाताने खालून धरायचे आणि त्याची पाठ चोळायची ही क्रिया आपण सामान्यतः प्रत्येक आई करत असते. त्यातच बाळाला थोडे -थोडे थोपवायचे ह्यामुळे बाळ एकतर उलटी करून पोट मोकळे करतं आणि बाळ स्वस्थ होते.

३. आपल्या कुशीत पालथे निजवून : बाळाला पालथे निजवावे आणि हाताने त्याची पाठ चोळावी. ही क्रिया का करावी कारण बऱ्याचदा बाळ खूप घाबरून जाते तेव्हा ही क्रिया करा. कारण आईच्या कुशीत बाळ सुरक्षित होऊन जाते. 

Leave a Reply

%d bloggers like this: