योनीमार्गाचा जंतू संसर्ग असा होतो ?

                                  प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. योनीमार्ग हा शरीराचा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे आणि या भागाची स्वछता आणि निगा ही राखली गेलीच पाहिजे. योनीमार्ग अनेक प्रकारचे संसर्ग आणि घाणीला सहज बळी पडते. स्त्रीच्या शरीरात सामान्यपणे  होणारे संक्रमण म्हणजेच ‘bacterial vaginosis’ – योनिमार्गाचा जंतुसंसर्ग ‘

 योनीमार्गाचा जंतुसंसर्ग म्हणजे काय?

योनिमार्गाच्या आतील भागात होणारा हा सौम्य जंतूसंसर्ग असतो. तुम्हाला माहित असेलच कि आपल्या शरीरात लाखो प्रकारचे जंतूचे अस्तित्व असते ज्यातील काही आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर काही वाईट.

जेव्हा योनिमार्गात या प्रकारचा संसर्ग  होतो तेव्हा या भागाचे  pH संतुलन बिघडते.तुमच्या योनीमार्गाच्या स्त्रावाचा pH ४. ५ किंवा यापेक्षा जास्त असतो तेव्हा तुम्हाला असे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. १५ ते ४५ वयोगटातील कोणत्याही स्त्रीला हे होऊ शकते. संपूर्ण उपचार घेतल्यानंतरही असा जंतुसंसर्ग परत होऊ शकतो.

गर्भवती महिलांना असा संसर्ग होऊ शकतो का?

होय,गर्भवती स्त्रियानाही या समस्येला सामोरे जावे लागते आणि या अवस्थेत होणारे संक्रमण हे जास्त त्रासदायक असते. यामुळे मुदतीआधीच प्रसववेदना होऊ शकतात आणि बाळाचे आरोग्य हि तितकेसे चांगले नसते आणि वजन प्रमाणापेक्षा कमी असते.

हे संक्रमण कसे होते?

या अवस्थेचे कारण म्हणजे चांगल्या जंतूंपेक्षा वाईट,रोगकारक जंतूंचे प्रमाण जास्त असणे. यामुळे तुमच्या शरीरातील स्रावांचे मोठ्या प्रमाणात असंतुलन घडून येते.

-तुम्ही शरीरसंबंध ठेवत असाल किंवा नसाल तरीही आणि एका पेक्षा जास्त जोडीदारांसोबत शरीरसंबंध असतील तर असे संक्रमण होऊ शकते.

-हा शरीरसंबंधाद्वारे लागण होणाऱ्या आजाराचा हा प्रकार नसला तरीही तुमच्या शरीराचे एरवी सुरळीतपणे चालणारे कार्य विस्कळीत होऊ शकते.

-जर तुम्ही नियमिपणे धुम्रपान करत असाल तर या संसर्गाला बळी पडू शकता .

– नियमितपणे योनीमार्ग धुतला गेला नाही तर तुम्हाला हे संक्रमण होण्याची शक्यता जास्त आहे.

-लक्षणे

-योनिमार्गाद्वारे होणार असामान्य स्त्राव

-राखाडी-पांढरट स्त्राव दिसून येणे

-हिरव्या रंगाचा स्त्राव हि होऊ शकतो

-योनीमार्गाचा सडका,ओंगळवाणा माश्यासारखा वास येणे

-योनीला खाज सुटणे

 

– लघवी करतांना अतिशय जळजळ होणे

-तुम्हाला माहित आहे का?

अनेक महिलांना वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत तरीही त्यांना योनीमार्गाचा जंतुसंसर्ग झालेला असतो.

– योनोमार्गाच्या जंतुसंसर्गाला बरे करण्यासाठी  घरगुती इलाज आहे का?

१]लसूण:

लसूण जंतूंच्या वाढीला प्रतिबंध करते आणि यामुळे योनिमार्गाचा संसर्ग लगेचच बारा होतो.

२]दही:

दही खाण्याने तुमचे शरीर आतून थंड राहते आणि याच्या जंतूंना अटकाव करण्याच्या क्षमतेमुळे योगिमार्गाची खाज आणि दुर्गंध याना पटकन आळा बसतो.

३]टि ट्री तेल :

योनीमार्गाचा जंतुसंसर्ग बरा करण्यासाठी हे वनस्पती तेल खूप फायदेशीर ठरते. या तेलात टेम्पोन बुडवून नंतर योमार्गातुन फिरवले जाते.

४] स्वछता आणि निगा राखणे

तुमचा योनीमार्ग आणि मालविसर्जनमार्ग एकमेकांच्या अगदी जवळ असतात त्यामुळे या भागांची नीट स्वच्छता राखणे गरजेचे असते. लघवी केल्यानंतर ओल्या अंगात अंतर्वस्त्रे चढवून बाहेर पडू नका. प्रत्येकवेळी हा भाग स्वछ धुवून काढा.

चांगल्या प्रतीच्या टिशू पेपरने मागून सुरु करून पुढं भाग पुसून घ्या. कोणत्याही प्रकारच्या जंतुसंसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी प्रत्येक वेळी योनीमार्ग टिपून कोरडा करा

Leave a Reply

%d bloggers like this: