बहुगुणी डाळिंब

डाळिंब हे  वात पित्त कफ त्रिदोषहारक,गोड डाळिंब ही बल व बुद्धि वाढवणारी असतात व प्रबळ पितकारक त्रिदोषांना नष्ट करणारी असतात. या डाळिंबाचे आरोग्यासाठी काय फायदे असतात हे आपण पाहणार आहोत. 

१. विविध आरोग्य विषयक समस्या मध्ये गुणकारी 

डाळिंब हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. डाळिंबाचा रस पीतशामक असतो व त्याच्या रसाने उलटी होणे बंद होते. जेवणातील अरुची, खोकला, डोळ्यांची जळजळ, अस्वस्थता  वाटणे या तक्रारी दूर होतात.  डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने शरीरात एक प्रकारची चेतना येते. ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यामध्ये खडीसाखर घालून प्याल्याने पित्त कमी होते. घसा बसलेला असल्यास डाळिंबाचा रस घेतल्याने तो बरा होतो. डाळिंबाचे साल तोंडात घेवून त्याचा रस चोखल्याने खोकला नाहीसा होतो. डाळिंबाचा रस व साखर सम प्रमाणात घेवून मिक्स करून घेतल्याने छातीत दुखत असेल तर ते थांबते. डाळिंबाच्या रसाने गर्भवती महिलेची उलटी थांबते.

२. हृदय विषयक आजारांमध्ये फायदेशीर 

हृदयाच्या आरोग्यासाठी डाळींबाचा रस अतिशय उपयुक्त आहे. हृदयविकारापासून दिलासा देण्याचे काम डाळींब करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. कॉलेस्ट्रॉलवर डाळींब नियंत्रण ठेवत असल्याच्या नोंदी संशोधकांनी केल्या आहेत.

३. दुर्धर आजारांमध्ये गुणकारी 

डाळिंबामधील औषधी गुण कर्करोग आणि मधुमेहासारख्या दुर्धर रोगांपासून दूर राहण्यासाठी उपयुक्त आहे. (मधुमेही व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्या प्रमाणात या फळाचे किंवा रसाचे सेवन करावे)

४. त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त 

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात. संतुलित आहारासोबत नियमित डाळींब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.

तर मग इतक्या समस्यांवर  उपयुक्त डाळींबाचे सेवन नक्की करा आणि  निरोगी रहा 

Leave a Reply

%d bloggers like this: