तान्ह्या बाळाच्या कानातला मळ साफ करताना घ्यायची दक्षता

सेरूमन जे सामान्यतः तान्हा बाळाच्या कानामध्ये घाण किंवा मळ म्हणून अडकून जाते. आणि आपल्याला हेच आश्चर्य वाटते की, आपण दररोज बाळाची अंघोळ करतो तरी कानात मळ कसा साचतो. तेव्हा हे कशामुळे होते तर मृत पेशी आणि चिप चिप असलेला पदार्थ ह्यापासून तयार होत असतो जो कानात असलेल्या ग्रंथीनी सोडला जातो. पण हे उलट संवेदनशील असणारे इयर ड्रम ला काही कणांपासून सुरक्षित ठेवत असते. ज्यामुळे कानाचे नुकसान होऊ शकते.


पण कानामध्ये मळ हा चिप चीप असल्याने तो घाण कण, धूळ, माती ह्यांना कानातल्या आत जाण्यापासून रोखत असतो. ह्याचमुळे कानातल्या मळाला बाळाच्या मेटाबोलिक प्रक्रियाकरीता सोडून द्यायला हवे. पण काही वेळा बाळ कानात खूप बोटं टाकून खाजतो किंवा रडत असतो. तेव्हा त्यात काही घाण, व धूलिकण असतात जी खाज आणतात आणि त्यावर बाळाला वेदनाही होत असतात. आणि जर मळच जास्त साचला तर ऐकायला व त्रासही होत असतो. आणि ही समस्या बऱ्याच पालकांना आपल्या तान्ह्या बाबत येत असते. तेव्हा ह्यासंबंधी हा लेख/ ब्लॉग.

१) कानात मूळ कसा तयार होतो ?

मुखत्वे करून कानातला मळ हा आतूनच पोकळीतून केसासारखा येतो त्याला सिलिया असे म्हटले जाते. आणि हे केव्हा होते ? तर ज्यावेळी कानाची त्वचा पुन्हा नवीन येते किंवा तयार होते त्यावेळी. आणि ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमध्ये इयरबड किंवा क्यू टिप्स द्वारा कानातला मूळ काढून काढले जाते. ह्या पद्धतीने बरेच पालक मळ काढत असतात पण ह्यात जर चूक झालीच तर कानातल्या कैनल मध्ये मळ वाढवू शकतो आणि काहीवेळा ब्लॉक ही होऊ शकतो.

२) कानातल्या मळाला कसे व्यवस्थित साफ करावे ?


कानातला मळ काढण्यासाठी सर्वात सोपा उपाय तर तान्हाच्या बाहेरचा भागाला ओल्या स्वच्छ कपड्याने साफ करून घ्यावे. आतल्या कैनल ला धक्का लागणार नाही तितकेच चांगले. आणि जर कानातल्या मळमध्ये पाणी साचायला लागले आणि बाळाला खूप त्रास होत असेल परत परत कानाला हात लावत असेल तर डॉक्टरांना भेटून घ्या. ह्यावर उपाय करणे सोपेच आहे पण कानातल्या आतल्या संवेदनशील भागाला धक्का लागण्यापेक्षा घरी उपाय न केलेला बरा. वैक्स मैल्टिंग सोल्यूशन ची काही थेंब मळ काढण्यासाठी वापरली जातात. आणि जर खूप जाड आणि टणक मळ झालेला असेल तर डॉक्टर क्यूरेटर नावाच्या उपकरणाने तो मळ काढतात. आणि ती पूर्णपणे कष्ट्रहित असते.

आणि जर ह्या सर्व पद्धती वापरून काही होत नसेल तर डॉक्टर तुम्हाला (ENT) तज्ञ् ला भेटावे लागेल. जे व्हॅक्युम द्वारे तान्हाचे मळ बाहेर काढत असतात.    

Leave a Reply

%d bloggers like this: