थंडीत अश्याप्रकारे त्वचेची काळजी घ्या.

हिवाळा हा असा ऋतू हा प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी आणि आरोग्यसाठी उपयुक्त असतो. पण याच काळात जर तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर हाच ऋत्तू तुमच्या त्वचेसाठी वाईट ठरू शकतो. त्यामुळे या काळात संतुलित आहारा बरोबर त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते 

१) तेलाने मसाज 

या दिवसात  खोबरेल तेल, इतर तेलाने अंगाला मसाज करून आंघोळ करणे हा त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे . किंवा  आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलेही तेलाचे दोन तीन थेंब घालावे. म्हणजे त्वचा  आपोआप मॉइश्चरायझ होते.

२) त्वचेत स्निग्धता निर्माण करा 

रात्री बदाम भिजवून, सकाळी त्याची साले काढून, पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून अंघोळीच्या आधी हे मिश्रण लावावे. त्यामुळे त्वचेत तेलाचा अंश राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही 

३) उटण्याचा वापर 

तसेच या काळात जर तुम्ही आयर्वेदिक उटण्याचा वापर त्वचेसाठी केला तर त्यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेवरील दोष दूर करण्यासही मदत करतात. उटणे  लावून अंघोळ करण्याचा अजून एक फायदा म्हणजे या थंडीमुळे त्वचेमध्ये निर्माण होणार कोरडेपणास प्रतिबंध होतो आणि त्वचा मॉश्चराईझ राहते. 

४) त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रब 

ज्यांच्या त्वचेचा प्रकार मुळतच कोरडा आहे त्याना थंडीत जास्त त्रास होतो. अशी त्वचा असणाऱ्यांनी  मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसाने स्क्रब केल्याने त्वचेतला ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

५) त्वचा मऊ होण्यासाठी 

या दिवसात दिवसभर त्वचेत स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी घरच्या घरी मॉयश्‍चरायझर करायचे झाल्यास लिंबूरस, गुलाबपाणी, आणि ग्लिसरीन समप्रमाणात घ्या. नियमित सकाळी आंघोळीनंतर या यामुळे तुमची त्वचा दिवसभर मऊ झाल्याचे जाणवेल 

६) हात-पायांची काळजी 

हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरूक्षता वाढल्याने भेगांमधून रक्‍त येणे या तक्रारी आढळतात. अशावेळी तळपायांना कोकमचे तेल लावावे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते.

Leave a Reply

%d bloggers like this: