व्हेरिकोज वव्हेन्स म्हणजे काय
सध्याच्या जीवनशैलीचा खोलवर परिणाम आरोग्यावर होत आहे. वेरीकोझ व्हेन्सची समस्या निर्माण होण्याच्या कारणांमध्ये बदलती जीवनशैली हे मुख्य कारण आढळून येत आहे. अशुद्ध रक्तवाहिन्या मध्ये (निलांमध्ये ) निर्माण झालेल्या रक्ताच्या गुठळ्यां किंवा निर्माण झालेली गुंतागुंत यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे आणि,पायात रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिन्यांमध्ये होते, फुफ्फुसाकडे रक्त शुद्धीकरणासाठी घेऊन जाण्याची भूमिका या निला पार पाडत असतात. या पायांतील रक्तवाहिन्यांमधील गुठळी जर वरच्या बाजूला सरकली,तर त्यामुळे एखाद्या फुफ्फुसातील रक्तवाहिनीत ब्लॉक होऊन व्यक्तीच्या फुफ्फुसातली रक्तशुद्धीकरणाची क्रियाच बंद होण्याची शक्यता असते होते.
लक्षणे-
पायांच्या खोलवरच्या निलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे.
खूप वेळ उभे किंवा बसल्यास पाय दुखणे.
पायांना वेदना होऊ लागणे.
पायात गोळे येणे.
पायाला सूज येणे.
सतत पायाला खाज येणे.
अस्वस्थ वाटणे
कारणे
कमी शारीरिक हालचालीं
रक्तात रक्त पातळ ठेवणाऱ्या घटकाची असंतुलित पातळी
आजाराने हालचाली कमी झाल्यास
गर्भनिरोधच्या गोळ्याचे अति सेवन
लठ्ठपणा
गंभीर जखम
वाढत्या वयोमानामुळे (वयस्कर व्यक्ती)
संप्रेरकांचे असंतुलन
सतत लांब पल्ल्याचा प्रवास करणे
व्हेरीकोज होऊ नये या करता घ्यावयाची काळजी
वजनावर नियंत्रण ठेवणे
प्रत्येक एक दोन तासांनी कामात ब्रेक घेणे.
पोटरीचे व्यायाम, घोट्याचे व्यायाम, व इतर व्यायाम करणे.
प्रवास करताना पायांची जास्तीत जास्त हालचाल करीत राहणे,
आराम करत असताना पाय उंचावर ठेवणे.
एका जागी जास्त वेळ उभे किंवा बसून राहू नये.
आहारातील मिठाचे प्रमाण योग्य असावे
उंच टाचांची पादत्राणे टाळणे.
एका जागी बसल्या-बसल्यादेखील पायाचे व्यायाम करणे,