पुरुषांचे शुक्राणू सक्षम करण्यासाठी . . .

              पुरुषांच्या शुक्राणूवर लेख लिहल्यानंतर प्रतिक्रिया आल्या की, आतापर्यंत बाळ होण्यासाठी स्त्रियांनाच गृहीत धरले जायचे. बाळ व्हायला पुरुषही तितकेच महत्वाचे असतात. ही गोष्ट आता – आता मान्य करायला लागले. नाहीतर बाळ न होण्यात स्त्रीलाच दोषी ठरवले जाते. ह्याबाबतीत तुम्हाला माहितीच आहे तिला वांझ ठरवले जाऊन बेदखल सुद्धा केले जाते. पण खरं म्हणजे बाळ होण्यासाठी पुरुषही तितकाच महत्वाचा असतो हे मागच्या लेखातून जाणून घेतले तेव्हा ह्या लेखातून पुरुषांचे शुक्राणू कसे सक्षम करता येतील त्याविषयी.

पुरुषांचे कमकुवत शुक्राणूंना सशक्त बनवण्यासाठी :
१) दररोज व नियमित व्यायाम

          सध्या खूप बसून व कमी श्रमाचे काम असल्याने शरीर बाहेरून फुगलेले दिसते पण आतून पोकळ असते. आणि ही गोष्ट स्पर्म (शुक्राणू) ऍक्टिव्ह राहण्यासाठी खूप महत्वाची असते की, तुमचे शरीर सशक्त हवे. म्हणजे बॉडी बिल्डर सारखे नाही. तर स्पर्मने हालचाल करायला हवी. त्यासाठी दररोज पळणे, व्यायाम करायला हवा. ह्यामुळे स्पर्म ऍक्टिव्ह होतील. म्हणून बऱ्याचदा जुन्या लोकांनी ही गोष्ट मर्दपणाशी जोडली. पण तसे नाहीये तर तुमचे स्पर्म ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे इतकेच.

२) मासे खात चला

तुम्ही एकतर मासे खात नसाल किंवा तुमची इच्छा नसेल पण मासे खाण्याने स्पर्म वाढायला व ऍक्टिव्ह व्हायला खूप मदत होते. कारण माश्यात ओमेगा – ३ फॅटी ऍसिड असते. हे एक असे सत्व आहे ते पुरुषांच्या शरीरात अधिक मात्रेत स्पर्म तयार करण्यात मदत करते. आणि ह्यामुळे खूप वजन वाढणार नाही. म्हणजे मोटपा येणार नाही तीही एक समस्याच आहे. बाळ न होण्यासाठी सुद्धा. कारण फिजिकली ऍक्टिव्हिटी कमी होऊन स्पर्म काउंट घटून जातो.

३) खूप वजन वाढवून घेऊ नका

जर पुरुषांचे वजन खूप अधिक असे तर शुक्राणूवरती खूप प्रभाव पडून जातो. त्यासोबत टाईप २ डायबिटीज सुद्धा शुक्राणूंवर प्रभाव पडत असतो. त्यासाठी प्रयत्न करा की, खूप चरबी साठून वजन वाढणार नाही.

४) खूप प्रमाणात दारू किंवा ड्रिंक घेऊ नका

अधिक प्रमाणात दारू पिणे ह्यामुळे हेल्थ (स्वास्थ) खराब होऊन जाते. आणि ह्यात स्पर्मची मात्रा व ऍक्टिव्हनेस कमी होत जाते. कारण दारू पुरुषांच्या शरीरातील DNA ला धक्का लागू शकतो. आणि त्यासोबत शुक्राणूंची संख्या घटत जाते. आणि त्यांचा वेगही घटत जाऊन गर्भधारणा व्हायला वेळ लागतो.

५) स्मोक करणे

सिगारेट शुक्राणूंच्या संख्येत कमी करण्यास खूप हातभार लावत असते. आणि दारुपेक्षाही सिगारेट जास्त धोकादायक असते.ह्यात पुरुषांच्या स्पर्म च्या व्हॉल्युम मध्ये आणि वेगात दोन्हीत घट आणू शकते. कारण स्मोकिंग करण्यामुळे प्रोस्टेट ग्लैंड आणि टेस्टीस ह्यांच्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. तेव्हा गरोदर न होण्यात पुरुषही तितकेच जबाबदार असतात तेव्हा शुक्राणूंची तपासणी महत्वाची आहे. आणि त्यात काही दोष आढळला तर त्यांच्या संख्येत आणि कार्यक्षम करण्यासाठी ह्या गोष्टी करू शकतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: