बाळ जन्मल्यानंतर सहा महिन्यानंतर बाळाला वरचा आहार द्यायला सुरुवात करावी. कारण जर बाळाला जितक्या प्रमाणात लागते तितक्या प्रमाणात उष्मांक मिळायला हवेत. आणि जर तेवढे मिळाले नाहीत तर बाळाची वाढ तितकी होणार नाही. व नंतरही बाळाचे वजन वाढायला समस्या येते. कारण जर तुम्ही वरचा आहार द्यायला उशिरा सुरुवात केली तर बाळ बाहेरचे अन्न घेत नाही व स्तनपानाचे दूधच प्यायचे हट्ट करते. आणि अशातच बाळाचे वजन खूप वाढत नाही. तेव्हा वरचा आहाराविषयी हा ब्लॉग.

१) स्तनपानानंतर किंवा दोन स्तनपानाच्या कालावधी दरम्यान एखादा पदार्थ देऊन बघावा म्हणजे त्याची सुरुवात करावी. जशी बाळाला वरच्या आहाराची सवय लागेल. तसे स्तनपानाचे अंतर वाढवायचे.
२) बाळाला फळे द्यायला सुरुवात करावी, नवा पदार्थ देण्यास सुरुवात करावी, म्हणजे बाळाला त्याची चव लागेल. काही दिवस पातळसर पदार्थ द्यावेत. आणि नंतर जास्त कॅलरी असलेले पदार्थ द्यावीत. आणि त्याची मात्रा वाढवत न्यावी.

३) बाळाला फॉर्मुला मिल्क देत असाल तर बाटली दररोज गरम पाण्याने धुवून घ्यावी. कारण जंतुदोष होण्याची शक्यता जास्त असते.
४) दिवसातून ६ ते ७ वेळा खाऊ घालावे. कारण बाळाचे पोट लहान असल्याने बाळ खूप कमी खात असतो.

५) बाळाला मूग डाळ, तूर डाळ, मोड आलेली धान्ये, हिरव्या पालेभाज्या, बारीक करून नियमितपणे देत राहा.
६) बाळाचा आहार करण्या आधी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. भांडी स्वच्छ धुतल्यावर उकळत्या पाण्यात बुडवून ठेवावीत. इतक्या गोष्टी बाळासाठी केल्यास बाळ कधी आजारी पडत नाही.
७) बाळाला खायला देताना त्याच्याशी बोलून संवाद करून खाऊ घालावे. त्याला घरभर फिरवून खाऊ घालावे ज्यावेळी बाळ कंटाळा करत असेल तर. आणि बाळाला पाणी गरम करूनच द्यावे. त्याबाबत खूप दक्षता ठेवावी.