ब्राऊन राईस सेवनाचे फायदे

आपल्या देशात बऱ्याच भागात भात ,तांदूळ हे मुख्य अन्न आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या तांदुळाचा वापर करण्यात येतो. यामध्ये सगळ्यात पौष्टिक ब्राऊन राईस असतो. ब्राऊन राईस म्हणजे आपल्या नेहमीच्या तांदुळाचे प्रक्रिया न केलेलं किंवा कमी प्रकिया केलेलं रूप. पांढरा तांदूळ हा जास्त प्रसिद्ध आहे आणि जास्त प्रमाणात खाण्यात येतो. परंतु हळू-हळू लोकांच्या आहारात आता ब्राऊन राईसचे प्रमाण वाढायला लागले आहे.  ब्राऊन हा राईस कार्बोहाइड्रेटचे उत्तम स्त्रोत आहे. आणि या तांदुळांत शरीरास आवश्यक असणारी अनेक अवश्य पोषक तत्व आहेत. जसे और इसमें आवश्यक पोषक विटामिन बी, पोटेशियम, मॅग्नाशीयम,सेलेनियम. या तांदुळाची चव देखील चांगली असते पौष्टिकतेच्या दृष्टीने हा तांदूळ पांढऱ्या तांदुळापेक्षा जास्त पौष्टिक असतो चावल

आरोग्यविषयक काही फायदे
१) हृदयाचे आरोग्य 

या तांदुळांत उत्तम प्रमाणात मॅगनेशियम तत्व असतात जी हृदयासाठी चांगली असतात. मॅगनेशियम रक्तदाबालानियंत्रणात ठेवतं म्हणून या तांदुळाचे सेवन रक्तदाबाचा स्तर आणि डोक्याकडे रक्त पुरवणाऱ्या धमन्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतो

२) आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करते

या तांदुळमध्ये सेलेनियमचे असणारे उत्तम प्रमाण आणि काही विशिष्ट घटक आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करतात. तसेच यामध्ये असणारे तंतुमय घटक आतड्याचे आणि पचन व्यवस्था निरोगी राखण्यास मदत करते

३) मधुमेहवर नियंत्रण ठेवते.

याप्रकारचे तांदूळ तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत करते

४) अँटिऑक्सिडेंट्सचा स्रोत 


 

हे तांदूळ अँटीऑक्सिडंट्सचे मुबलक स्त्रोत आहे जे मुक्त , जे आपल्याला आक्सिजन रेडिकलमुळे होणा-या नुकसानापासून संरक्षण करतात.या तांदुळमध्ये उपस्थित सुपरऑक्साइड डिसमुटिस अँटीऑक्सिडेंट हे ऊर्जा उत्पादन दरम्यान ऑक्सिडेशन द्वारे झाल्याने नुकसान पासून रक्षण करते .

५) हाडांच्या आरोग्यासाठी

या तांदुळामध्ये उपस्थित असलेले मॅग्नेशिअम मजबूत हाडांसाठी पोषकअसते . मॅग्नेशिअमची कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस ही हाडांविषयक समस्या निर्माण होऊ शकते.

६. अनिद्रा

हा तांदूळ मेलाटोनिनचा एक नैसर्गिक स्त्रोत आहे, या तांदुळाच्या सेवनामुळे योग्य प्रमाणात मेलाटोनिन स्त्रवते आणि चांगली झोप येते आणि अनिद्रेची समस्या कमी होते.

७. कोलेस्ट्रोलचे नियंत्रण

ब्राऊन तांदूळ नैसर्गिकरित्या असणारे तेल हे शरीरातील निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करतात. तसेच कोलेस्ट्रोलचे चयापचय नियंत्रित करते

८. प्रतिकारशक्ती वाढविते

हा तांदूळ म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजंसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचा एक समृद्ध आणि मुबलक स्त्रोत आहे जे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.

९. बाळासाठी आहार

लहान मुलांसाठी पोषक समृध्द आहार आवश्यक असतो. त्यामुळे हा तांदूळ बाळासाठी परिपूर्ण अन्न आहे. तसेच यात तंतुमय घटक आणि अनेक नैसर्गिक पोषक तत्त्वांचा देखील समावेश असल्याने हा बाळासाठी हा पोषक आहाराचा उत्तम पर्याय मानण्यात येतो. 

Leave a Reply

%d bloggers like this: