लहान मुलांमध्ये जंत,कृमी होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते लहान मुलांप्रमाणे प्रौढांमध्ये देखील जंत कृमींची समस्या आढळून येते आणि ही समस्या निर्माण होण्याचे प्रमुख कारण हे अस्वच्छता हे असू शकते. हे जंत कश्यामुळे होतात त्याची लक्षणे काय आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते हे आपण जाणून घेणार आहोत
लक्षणे
१) सतत बारीक पोटात दुखणे
२) जुलाब किंवा सतत शौच्यास होणे
३) अशक्तपणा येणे
४) अंगावर पांढरे डाग येणे
५) भूक न लागणे किंवा अति भूक लागणे
६) गुददद्वारास कंड सुटणे
७) शौचाद्वारे कृमी किंवा जंत पडणे
स्वच्छता विषयक कारणे
१)शौच्याला जाऊन आल्यावर स्वच्छ हात न धुनये
२) नख वेळच्या-वेळी न कापणे.
३)उघड्यावरचे पदार्थ खाणे
४) अस्वच्छ पाणी पिणे.
आरोग्यविषयक करणे
१)अपचन झाले असतानाही जेवण करणाऱ्यांमध्ये करणे
२)गोड व आंबट चवीच्या पदार्थांचे अधिक सेवन करणे
३)पिष्टमय पदार्थ या सारख्या पदार्थांचे अति सेवन
४) व्यायामाचा अभाव
५)दिवसा वेळी-अवेळी झोपणे
घरगुती उपाय
१) शेवग्याच्या शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरे पूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.
२) रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात. किंवा महिन्यातून एकदा वावडिंगाचे पाणी पिणे
३)जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.
४) कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.
५) कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.
६)डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या प्रमाणात घेतले तर जंतचे प्रमाण कमी होते
जंत होऊ नये म्हणून आहारात या गोष्टींचा समावेश करा
जंत होऊ नये म्हणून आहारात कढीलिंब,ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, सैंधव मीठ, शेवगा, दालचिनी, मुळा, मोहरी या या गोष्टींचा आहारात नियमितपणे समावेश करता येतो.
हे पदार्थ टाळावे
थंड पाणी, दही, मांसाहार, दुधापासून बनवलेले पदार्थ, मिठाया, कच्च्या पालेभाज्या,वनस्पती तुपात तळलेले पदार्थच्या सेवनामुळे जंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या पदार्थाच्या अति सेवनानंतर जंत झाल्याची काही लक्षणे दिसत आहेत का याकडे लक्ष ठेवावे